Pratiyuti Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Double Pratiyuti Yoga In Astrology July 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या नक्षत्रांमधील बदलांना आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले जाते.

Manish Jadhav

Double Pratiyuti Yoga In Astrology July 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या नक्षत्रांमधील बदलांना आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले जाते. यामध्येच 'प्रतियुति योग' हा असाच एक महत्त्वाचा योग मानला जातो, जो दोन ग्रह जेव्हा एकमेकांच्या अगदी आमने-सामने म्हणजेच 180 अंशांच्या कोनात येतात, तेव्हा निर्माण होतो. सामान्यतः प्रतियुति योगाचा सर्व राशींवर अशुभ आणि नकारात्मक प्रभाव पडतो.

द्रिक पंचांगानुसार, जुलै महिन्यात दोन वेळा म्हणजेच 'डबल प्रतियुति योग' तयार होत आहे. पहिला प्रतियुति योग 19 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी बनेल, तर त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच 27 जुलै रोजी पहाटे 3 वाजून 13 मिनिटांनी दुसरा प्रतियुति योग निर्माण होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा येणारा हा अशुभ योग प्रामुख्याने 5 राशींच्या जातकांसाठी अत्यंत त्रासदायक आणि आव्हानात्मक ठरणार आहे.

या अशुभ योगाचा फटका बसणारी पहिली रास मेष आहे. मेष राशीच्या नोकरदार व्यक्तींना कार्यस्थळावर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा शांत न राहिल्यामुळे वरिष्ठांशी मोठे वाद होऊ शकतात. तसेच, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येऊन केलेले काम विवाहित जातकांचे मोठे नुकसान करु शकते. दुसरी रास मिथुन असून, या जातकांनी ऑफिसमध्ये बॉसने दिलेले काम वेळेत पूर्ण न केल्यास नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. या काळात तुम्हाला मोठ्या आर्थिक चणचणीचा सामना करावा लागेल आणि तुमच्या लव्ह लाईफमध्येही आधीपेक्षा जास्त कटुता निर्माण होऊ शकते.

तिसरी प्रभावित रास कन्या आहे. कन्या राशीच्या जातकांचा व्यवसाय किंवा व्यापार या काळात मंदावल्यामुळे त्यांना तीव्र मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक संकट ओढवण्याची दाट शक्यता असून, घरातील वृद्ध मंडळींना आपल्या खालावलेल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करुन चालणार नाही. चौथी रास धनु असून, शिस्त आणि नियमांचे पूर्णपणे पालन न केल्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद वाढल्यामुळे नोकरीवर टांगती तलवार राहू शकते, तसेच तुमचे प्रेम जीवनही या काळात फारसे आनंदी असणार नाही.

शेवटची म्हणजेच पाचवी रास मकर आहे. मकर राशीच्या मुलांनी आरोग्याला (Health) हानिकारक असणारे अन्न खाल्ल्यास ते प्रदीर्घ काळासाठी आजारी पडू शकतात. या काळात तुम्ही केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता असून मनासारखे फळ मिळणार नाही. याशिवाय, विवाहित जातक घरगुती कामांमध्ये इतके व्यस्त राहतील की त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होईल. त्यामुळे या पाचही राशींनी जुलै महिन्यात अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT