Grah Gochar Dainik Gomantak
Horoscope

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Double Dwidwadash Yoga 1 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्र आणि दृक पंचांगानुसार 1 सप्टेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जात आहे.

Manish Jadhav

Double Dwidwadash Yoga 1 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्र आणि दृक पंचांगानुसार 1 सप्टेंबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जात आहे. या दिवशी आकाशात ग्रह-तारे एका अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योगाची निर्मिती करत आहेत. बुध, गुरु आणि मंगळ या तीन प्रमुख ग्रहांच्या विशेष हालचालींमुळे हा दुर्मिळ संयोग घडत आहे. यामध्ये मुख्यत्वे देवगुरु बृहस्पती यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीत विराजमान असेल, तर मंगळ त्यांच्या एक भाव मागे म्हणजेच मिथुन राशीत आणि बुध ग्रह गुरुच्या एक राशी पुढे म्हणजेच सिंह राशीत असणार आहे. जेव्हा ग्रह एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर किंवा अशा स्थितीत असतात, तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात 'द्विद्वादश योग' म्हटले जाते. 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळ यांच्यात असा 'डबल द्विद्वादश योग' तयार होत आहे, जो करिअर (Career), व्यापार आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रचंड फलदायी मानला जातो. देवगुरु बृहस्पतींच्या प्रभावामुळे लोकांच्या निर्णयक्षमतेत आणि भाग्यात सकारात्मक बदल दिसून येतील.

या दुर्मिळ योगाचा प्रभाव सर्वच 12 राशींवर पडणार असला, तरी 4 राशींसाठी हा काळ 'सुवर्णकाळ' सिद्ध होणार आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये अचानक नव्या संधी आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. कर्क राशीच्या जातकांना स्वतःच्या राशीत गुरु असल्याने आत्मविश्वास, पदोन्नती आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहामुळे संवादकौशल्य सुधारेल आणि व्यापारात नवी रणनीती यशस्वी ठरेल, तर तूळ राशीच्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभून नेटवर्कच्या जोरावर मोठा आर्थिक फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT