8th Pay Commission: सॅलरी, DA मर्जर ते 15 लाखांचा विमा! डिफेन्स स्टाफ युनियनचा मोठा प्रस्ताव; केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी?

8th Pay Commission Bpms 73 Demands: आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संघटनेने, म्हणजेच भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने आयोगासमोर तब्बल 73 मागण्यांचा सविस्तर प्रस्ताव सादर केला.
8th Pay Commission Bpms 73 Demands
8th Pay Commission Bpms 73 DemandsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Bpms 73 Demands: आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संघटनेने, म्हणजेच भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने आयोगासमोर तब्बल 73 मागण्यांचा सविस्तर प्रस्ताव सादर केला. संरक्षण मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त असलेल्या या संघटनेने वेतनरचना, निवृत्ती वेतन, विमा कवच आणि बचत योजनांमध्ये मूलभूत बदल सुचवले आहेत. वाढती महागाई आणि बदलती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला भक्कम आधार मिळावा, हा या मागण्यांमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्रीय सरकारी कर्मचारी (Employees) समूह विमा योजनेतील रक्कम सध्याच्या 30 हजार रुपयांवरुन थेट किमान 15 लाख रुपये करण्याची मागणी बीपीएमएसने केली. तसेच या योजनेतील इतर लाभ वाढवून 10 लाख रुपये करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. वेतन आणि महागाईचा समतोल साधण्यासाठी वार्षिक वेतनवाढ सध्याच्या 3 टक्क्यांवरुन दुप्पट म्हणजेच 6 टक्के करावी, असा आग्रह धरण्यात आला.

8th Pay Commission Bpms 73 Demands
8th Pay Commission Salary: 8वा वेतन आयोग लागू झाल्यास पगार किती वाढणार? लेव्हल 3 ते 6 च्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे गणित

किमान मूळ वेतन ठरवताना सध्याचा बाजारभाव आणि कुटुंबाचे दैनंदिन खर्च विचारात घेऊन भारतीय श्रम संमेलनाचे निकष आणि एक्रॉइड सूत्र लागू करावे, तसेच किमान व कमाल वेतनातील गुणोत्तर 1:10 पेक्षा जास्त असू नये, असेही सुचवण्यात आले. याशिवाय, सध्याच्या महागाई भत्त्यातील 50 टक्के हिस्सा मूळ वेतन आणि निवृत्ती वेतनात विलीन करुन नवी वेतनरचना तयार करण्याची मागणी करण्यात आली.

8th Pay Commission Bpms 73 Demands
8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत NC-JCM चा मोठा दावा! अंमलबजावणीस उशीर झाल्यास एरियरचे नुकसान होणार का? जाणून घ्या सविस्तर

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि एनपीएस तसेच यूपीएस रद्द करावे, असा महत्त्वाचा मुद्दाही संघटनेने उचलून धरला. तसेच जनरल प्रॉव्हिडंट फंडावरील व्याजदर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरापेक्षा कमी न ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. आठव्या वेतन आयोगासमोर सादर झालेल्या या प्रस्तावातील कोणत्या मागण्यांना आयोग हिरवा कंदील देतो, याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.