Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope 6 May 2026: बुधवारचा दिवस 4 राशींसाठी 'गोल्डन डे'! गुंतवणुकीतून मिळणार बंपर परतावा, नशिबाची लाभणार साथ; आर्थिक लाभासाठी ग्रहांची स्थिती अनुकूल

Zodiac Sign Predictions Today: आज 6 मे 2026, बुधवारचा दिवस सर्व राशींच्या व्यक्तींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार महत्त्वाचे बदल घेऊन येणारा आहे.

Manish Jadhav

Daily Horoscope 6 May 2026: आज 6 मे 2026, बुधवारचा दिवस सर्व राशींच्या व्यक्तींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार महत्त्वाचे बदल घेऊन येणारा आहे. चंद्र आणि इतर ग्रहांच्या गोचरामुळे आज काही राशींना आर्थिक लाभ होईल, तर काहींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक दृष्टीकोनातून आजचा दिवस धावपळीचा असला तरी कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. कौटुंबिक जीवनात शांतता राखण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक ठरेल. चला तर मग जाणून घेऊया, आजचे तुमचे राशीभविष्य नेमके काय सांगते.

मेष (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. नवीन प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन होईल.

वृषभ (Taurus)

आर्थिक बाबतीत आजचा दिवस शुभ आहे. जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना आज चांगल्या संधी चालून येतील. प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. जवळच्या मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा महिनाअखेरीस ओढाताण होऊ शकते. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावू शकते.

कर्क (Cancer)

आज मनामध्ये थोडी अस्वस्थता जाणवेल. घरातील वरिष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यानेच महत्त्वाचे निर्णय घ्या. व्यवसायात स्पर्धकांपासून सावध राहा. कौटुंबिक वादात पडणे टाळा. संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आखल्यामुळे मन प्रसन्न होईल.

सिंह (Leo)

सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. अडकलेली कामे मार्गी लागतील. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवाराकडून आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उत्तम असून भविष्यात त्याचे चांगले फायदे मिळतील.

कन्या (Virgo)

नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाचा ताण असला तरी तुम्ही तो यशस्वीपणे हाताळाल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखद आणि लाभदायक ठरेल. घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ (Libra)

तुळ राशीच्या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत. कोर्टकचेरीच्या कामात सावधानता बाळगा. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस मध्यम आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि मानसिक शांतता लाभेल.

वृश्चिक (Scorpio)

आज तुम्हाला अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल. कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. मात्र, गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परिश्रमाचा असेल. मेहनतीशिवाय फळ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. तब्येत नरम-गरम राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील.

मकर (Capricorn)

व्यावसायिक क्षेत्रात तुमची छाप पाडाल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तींकडून मदत मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळण्यास सुरुवात होईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराशी असलेल्या मतभेदांवर पडदा पडेल.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींना आज भाग्याची साथ मिळेल. रचनात्मक कामात यश लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आज शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक नियोजन करताना तज्ञांचा सल्ला घ्या.

मीन (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शांततेत जाईल. रखडलेले प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवेल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. मनात सकारात्मक विचार ठेवा, ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT