

Daily Horoscope April 30 2026: आज गुरुवार, 30 एप्रिल 2026. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त आज आहे. आजचा दिवस सर्व 12 राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून शकते. मेष ते मीन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केलेल्या गुंतवणुकीचा भविष्यात लाभ होईल, मात्र घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरु शकतात, त्यामुळे आजचा दिवस संयमाने आणि नियोजनाने व्यतीत करणे फायद्याचे ठरेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची किंवा मालमत्तेची खरेदी करणे शुभ ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.
आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
आज तुम्हाला धावपळ करावी लागेल. महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात, पण तुमची जिद्द तुम्हाला यश मिळवून देईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यानधारणा करा. प्रवासाचे योग आहेत.
तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. घरात मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम आहे. आरोग्यात सुधारणा होईल आणि उत्साही वाटेल.
आत्मविश्वास वाढेल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. मात्र, गुप्त शत्रूंपासून सावध राहा. व्यवहारात स्पष्टता ठेवा.
आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अचानक काही खर्च उद्भवू शकतात. कामाचा ताण वाढल्याने थकवा जाणवेल. मित्रांच्या मदतीने काही कठीण कामे सोपी होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम दिवस आहे. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना नवीन व्यासपीठ मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मनाप्रमाणे गोष्टी घडतील.
यशाचा मार्ग प्रशस्त होईल. तुमच्या कष्टाचे फळ आज तुम्हाला मिळेल. विरोधक पराभूत होतील. जमिनीच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. घरातील थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करा. प्रेमसंबंधात गोडवा येईल.
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कौटुंबिक वाद मिटतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त लाभदायी ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कामाच्या ठिकाणी कामाचा डोंगर उभा असेल, पण तुम्ही ते चोखपणे पूर्ण कराल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. अनावश्यक चिंता करणे टाळा. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
तुमच्या पराक्रमात वाढ होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. प्रवासात सावधगिरी बाळगा. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना आज चांगली संधी मिळू शकते.
वाणीत गोडवा ठेवा, यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील. बँक आणि गुंतवणुकीशी संबंधित कामात यश मिळेल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अध्यात्माकडे कल वाढेल आणि मन प्रसन्न राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.