May 2026 Grah Gochar Dainik Gomantak
Horoscope

May 2026 Grah Gochar: ग्रहांचा राजा आणि राजकुमार एकाच रथात! 15 मे पासून 5 राशींसाठी सुवर्णकाळ सुरु; 'या' नशिबवान लोकांवर होणार पैशांचा पाऊस

Budhaditya Yoga 15 May 2026: येत्या 15 मे 2026 रोजी अवकाशात दोन अत्यंत महत्त्वाच्या खगोलीय घटना एकाच वेळी घडणार आहेत.

Manish Jadhav

Budhaditya Yoga 15 May 2026: येत्या 15 मे 2026 रोजी अवकाशात दोन अत्यंत महत्त्वाच्या खगोलीय घटना एकाच वेळी घडणार आहेत. ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार असलेला बुध हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी शुक्राच्या मालकीच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रात सूर्य आणि बुध यांची युती अत्यंत शुभ मानली जाते, कारण यातून 'बुधादित्य योग' निर्माण होतो. कोणत्याही दोन महत्त्वाच्या ग्रहांचे एकाच दिवशी होणारे राशी परिवर्तन ही एक मोठी ज्योतिषीय घटना मानली जाते, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होतो.

ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, या महागोचरमुळे निर्माण होणारा बुधादित्य योग सर्वच राशींना प्रभावित करेल, मात्र 5 राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ वैयक्तिक प्रगतीचा असेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक येईल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. रखडलेली कामे आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण होतील आणि व्यवसायातील अडचणी दूर होऊन धनलाभाचे प्रबळ योग येतील. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अधिक सर्जनशील ठरणार आहे.

सिंह राशीच्या लोकांसाठी हा बुधादित्य योग आयुष्याचा 'टर्निंग पॉईंट' ठरु शकतो. नोकरीत असलेल्यांना कामाच्या ठिकाणी विशेष महत्त्व मिळेल आणि वरिष्ठांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. कन्या राशीच्या जातकांसाठी हा बदल गाडी 'टॉप गियर'मध्ये टाकण्यासारखा असेल. त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली असून गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य-बुधाची ही युती यशाच्या नवीन शिखरावर नेणारी ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि बॉस तुमच्या कामगिरीवर खुश राहतील, ज्यामुळे पगारात वाढ किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी मोठी डील होण्याची किंवा सरकारी कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी हा गोचर नवीन संधींची दारे उघडणारा ठरेल. विशेषतः मीडिया आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नवीन नोकरीचे प्रस्तावही येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT