Budhaditya Rajyog Dainik Gomantak
Horoscope

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

Budhaditya Rajyog: बुध ग्रह आधीच कुंभ राशीत विराजमान असून, सूर्यदेवांनी या राशीत प्रवेश करताच हा शुभ संयोग जुळून येईल.

Manish Jadhav

Budhaditya Rajyog 2026: शुक्रवारी म्हणजेच उद्या (13 फेब्रुवारी) कुंभ राशीत सूर्य आणि बुध या दोन ग्रहांची युती होणार असून यातून अत्यंत शक्तिशाली अशा 'बुधादित्य राजयोगा'ची निर्मिती होत आहे. बुध ग्रह आधीच कुंभ राशीत विराजमान असून, सूर्यदेवांनी या राशीत प्रवेश करताच हा शुभ संयोग जुळून येईल. 15 मार्चपर्यंत प्रभावी राहणाऱ्या या योगाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार असला, तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तीन राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असणार आहे.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, सत्ता आणि सरकारी यशाचे कारक मानले जाते, तर बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार आणि संवादाचा अधिपती आहे. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात, तेव्हा बुद्धी आणि कर्तृत्वाच्या जोरावर व्यक्तीला प्रचंड यश आणि धनसंपत्ती प्राप्त होते.

प्रसिद्ध ज्योतिषाचार्य हर्षवर्द्धन शांडिल्य यांच्या मते, या राजयोगामुळे मेष, मिथुन आणि कुंभ या तीन राशींच्या नशिबाचे कुलूप उघडणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना करिअर, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात अशा काही संधी मिळतील की ज्याचे रुपांतर मोठ्या धनलाभात होईल.

मेष राशीच्या जातकांसाठी हा राजयोग करिअरमध्ये मोठी भरभराट घेऊन येईल. तुमच्या निर्णयक्षमतेचे कार्यक्षेत्रात कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. तसेच, रखडलेली कामे मार्गी लागतील आणि व्यापारात नवनवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील. विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Student) आणि गुंतवणूकदारांसाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरेल. योग्य नियोजनाच्या जोरावर तुम्ही तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करु शकाल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी तर हा काळ भाग्योदयाचा ठरेल, कारण बुध हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. नशिबाची साथ लाभल्यामुळे तुमची दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा नवीन रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. जे लोक परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या संवाद कौशल्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रभावित कराल, ज्यामुळे भागीदारीच्या व्यवसायात मोठे यश मिळेल. बचत वाढल्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

सर्वात महत्त्वाचा प्रभाव हा कुंभ राशीवर असणार आहे, कारण हा राजयोग तुमच्याच राशीत साकारत आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसेल आणि तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. करिअरमध्ये एखादी मोठी उपलब्धी मिळण्याची दाट शक्यता असून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. सरकारी कामांमध्ये अडकलेले पैसे परत मिळतील आणि केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल. दूरदृष्टीने घेतलेले निर्णय तुम्हाला मालामाल करु शकतात. थोडक्यात, या 3 राशींच्या जातकांसाठी हा महिना केवळ यशच नाही, तर अमाप धन, यश आणि प्रतिष्ठा घेऊन येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

Student Mental Health: 'तू हरलास तरी मी पाठीशी आहे' म्हणणारं कुणी उरलंय का? शिक्षणाच्या बाजारात हरवलेली माणुसकी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT