Budh Shukra Yuti Dainik Gomantak
Horoscope

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

Budh Shukra Yuti Rashifal: 26 नोव्हेंबर रोजी होणारी बुध-शुक्रची ही पूर्ण युती मंगल ग्रहाच्या मालकीच्या वृश्चिक राशीत होत आहे, जो एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग आहे.

Manish Jadhav

Budh Shukra Yuti Rashifal: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नऊ ग्रह आपल्या गोचर काळात इतर ग्रहांजवळ येतात आणि विविध प्रकारचे योग तसेच दृष्ट्यांची निर्मिती करतात. याच क्रमाने मंगळवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी एक अत्यंत शुभ योग तयार होत आहे. या दिवशी बुध आणि शुक्र ग्रहांची 'पूर्ण युती' होत आहे. बुद्धी, वाणी आणि विवेक यांचा कारक ग्रह बुध आणि सुख, ऐश्वर्य तसेच प्रेम यांचा कारक ग्रह शुक्र हे एकमेकांशी ०° अंशाच्या कोनीय स्थितीत असणार आहेत. द्रिक पंचांगनुसार, ही बुध-शुक्र पूर्ण युती सकाळी 07:19 वाजता होईल.

दुर्मीळ 'लक्ष्मी नारायण योग'

ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, 26 नोव्हेंबर रोजी होणारी बुध-शुक्रची ही पूर्ण युती मंगल ग्रहाच्या मालकीच्या वृश्चिक राशीत होत आहे, जो एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग आहे. याला ज्योतिषशास्त्रात 'लक्ष्मी नारायण योग' (Lakshmi Narayan Yog) असेही म्हटले जाते. या शुभ योगाचा परिणाम सर्वच राशींवर होणार असला तरी, विशेषतः 4 राशींच्या जातकांसाठी हा योग अत्यंत फलदायी आणि भाग्यशाली सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना धन, सुख आणि सौभाग्य वाढीस लागण्याचे योग आहेत. चला तर मग या 4 भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया...

1. वृषभ (Taurus)

बुध-शुक्रची ही पूर्ण युती वृषभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक समृद्धीचे दरवाजे उघडणारी ठरु शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात अचानक मोठा लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध अधिक मधुर बनतील. वैवाहिक जीवनातही सुख आणि सौख्य वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत झालेली भेट तुमच्या भविष्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकते. मेहनतीला भाग्याची साथ मिळणार आहे.

2. कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी ही युती मानसिक शांती आणि आर्थिक समाधान घेऊन येईल. घर-परिवारात आनंदी वातावरण राहील आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नती (Promotion) किंवा मान-सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या कामाची किंवा नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. अचानक धनलाभ किंवा गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची मजबूत शक्यता आहे. विद्यार्थी आणि कलात्मक कामांशी जोडलेल्या लोकांना विशेष यश मिळू शकते.

3. वृश्चिक (Scorpio)

बुध-शुक्रची ही दुर्मिळ युती तुमच्या स्वतःच्या राशीत बनत असल्यामुळे याचा प्रभाव सर्वात जास्त शुभ दिसत आहे. आत्मविश्वास वाढेल आणि तुमची नेतृत्व क्षमता (Leadership Skills) अधिक प्रभावीपणे समोर येईल. आर्थिक स्थिती मजबूत बनू शकते. नवीन प्रकल्प (New Projects), नवीन भागीदारी (New Partnership) किंवा नवीन संधींचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच, दांपत्य जीवनात सामंजस्य आणि प्रेम वाढेल. तुमचे लव्ह रिलेशनशिप्स (Love Relationships) अधिक घनिष्ट होईल. हा काळ भाग्य, बुद्धी आणि आकर्षण शक्तीला वाढवणारा ठरेल.

4. मकर (Capricorn)

मकर राशीच्या जातकांसाठी हा योग धन, सौभाग्य आणि प्रतिष्ठा वाढवणारा सिद्ध होईल. करिअरमध्ये मोठे बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठे व्यवहार आणि भरघोस नफ्याचे संधी मिळू शकतात. पालकांच्या सहकार्याने एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होऊ शकते. उत्पन्नात वाढ आणि बचतीत स्थिरता येण्याची स्थिती बनेल. एकूणच हा काळ तुमच्या जीवनात स्थिरता, सुख आणि आत्मविश्वास भरुन आणणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

विकेट पडताच टीव्ही बंद करायचे, 'या' महान भारतीय क्रिकेटपटूला मुलगा मानायचे, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 'ती' खास पोस्ट चर्चेत!

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT