Budh Guru Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budh Guru Yog 2026: धनलाभाचा 'राजयोग'! 22 सप्टेंबरपासून 4 राशींची तिजोरी पैशांनी भरणार; बुध आणि गुरुच्या चालीनं बदलणार नशिबाचं चक्र

Budh Guru Yoga 22 September 2026: द्रिक पंचांगानुसार, येत्या मंगळवार, 22 सप्टेंबरपासून बुध आणि गुरु यांच्यात अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा 'लाभ दृष्टी योग' निर्माण होत आहे.

Manish Jadhav

Budh Guru Yoga 22 September 2026: वैदिक ज्योतिषात बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांना अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. जेव्हा हे दोन महान ग्रह एकत्र येतात किंवा एकमेकांवर शुभ दृष्टी टाकतात, तेव्हा राजयोगासारखी स्थिती निर्माण होते. सध्याच्या काळात बुध आणि गुरु दोन्ही ग्रह आपापल्या उच्च राशीत विराजमान असल्याने त्यांची फळ देण्याची क्षमता अत्यंत उच्च पातळीवर आहे. द्रिक पंचांगानुसार, येत्या मंगळवार, 22 सप्टेंबरपासून बुध आणि गुरु यांच्यात अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा 'लाभ दृष्टी योग' निर्माण होत आहे.

जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 60 अंशांच्या अंतरावर येतात, तेव्हा हा योग तयार होतो. ज्योतिषाचार्यांच्या मते, या शुभ योगामुळे व्यक्तीचे ज्ञान, निर्णयक्षमता आणि आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळणार असून अनेक क्षेत्रांत यशाचे नवे दरवाजे उघडतील. या महा-योगाचा सर्वाधिक फायदा चार विशिष्ट राशींना होणार आहे.

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा योग आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत अत्यंत लाभदायक ठरेल. बँकिंग, फायनान्स, रिअल इस्टेट आणि वडिलोपार्जित व्यवसायाशी जोडलेल्या लोकांना मोठा धनलाभ संभवतो. तुमची संवादशैली अधिक प्रभावी बनेल, ज्यामुळे अडकलेले काम पूर्ववत सुरु होईल आणि जुने अडकलेले पैसे परत मिळतील. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने या राशीच्या लोकांची निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत होईल. मीडिया, आयटी, मार्केटिंग आणि लेखनाशी संबंधित लोकांना कामाच्या ठिकाणी स्मार्ट वर्कमुळे मोठे यश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ लाभेल.

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ एखाद्या 'गोल्डन टाईम'सारखा सिद्ध होऊ शकतो. तुमची तार्किक क्षमता आणि अचूक निर्णय घेण्याची कला तुम्हाला सर्व क्षेत्रांत आघाडीवर ठेवेल. संशोधन, शिक्षण, डेटा ॲनालिसिस आणि शेअर बाजाराशी निगडित लोकांना मोठा नफा होईल, तसेच नोकरदारांना पुरस्कार किंवा विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. शेवटी, धनु राशीचा स्वामी गुरु असल्याने या राशीच्या जातकांच्या करिअर (Career) आणि सामाजिक प्रतिमेत प्रचंड सुधारणा होईल. परदेशाशी संबंधित कामे यशस्वी होतील आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात कटुता संपून जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल, ज्यामुळे नशिबाला एक नवी दिशा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Ranji Trophy: बिहारवर फॉलोऑनची नामुष्की; गोव्याची 290 धावांची आघाडी, पहिल्या विजयाची चाहूल

IND vs NZ 1st ODI: किंग कोहली बनला 'सुपरमॅन'! हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच; कॅप्टन कूलचा मोडला रेकॉर्ड VIDEO

Human Trafficking: पीडित महिलांना दोष नको; मानवी तस्कर, दलाल आणि शोषणाच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करा – एआरझेड

Goa Politics: 'खरी आरजी कोणती?' यापेक्षा नेते एकत्र राहणार का? अंतर्गत संघर्षाने पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT