Budh Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budh Gochar 2026: 4 डिसेंबरपासून 'या' 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु! बुध गोचरमुळे होणार तगडा फायदा; चांगल्या दिवसांची नांदी

Lucky Zodiac Signs Mercury Transit Anuradha Nakshatra: बुध ग्रहाचे अनुराधा नक्षत्रातील गोचर 13 डिसेंबरपर्यंत राहणार असून, या काळात चार राशींच्या नशीबाचे दार उघडण्याची शक्यता आहे.

Manish Jadhav

Lucky Zodiac Signs Mercury Transit Anuradha Nakshatra: बुध ग्रहाचे अनुराधा नक्षत्रातील गोचर 13 डिसेंबरपर्यंत राहणार असून, या काळात चार राशींच्या नशीबाचे दार उघडण्याची शक्यता आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या बदलामुळे करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बळकटी आणि कामात यश मिळण्याचे योग निर्माण झाले आहेत. हा काळ वृषभ, कर्क, कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी विशेष अनुकूल मानला जात आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचा हा नक्षत्र बदल अत्यंत लाभदायक ठरेल. या काळात भाग्याची उत्तम साथ मिळून नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल तसेच वैवाहिक जीवनातही समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण राहील. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ असून, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक परिणाम दिसतील, व्यवसायात नफा वाढेल आणि गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल राहील.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुध अनुराधा नक्षत्रात गेल्याने आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. नवीन नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात आणि कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरणार असून, आर्थिक बाजू अधिक भक्कम होईल. व्यावसायिकांना एखादा मोठा व्यवहार किंवा डील मिळाल्याने चांगला लाभ होऊ शकतो. एकंदरीत 13 डिसेंबरपर्यंतचा हा टप्पा या चारही राशींसाठी प्रगतीचा आणि संधींचा राहणार आहे. वेळेचा योग्य फायदा घेत नियोजनबद्ध पावले उचलल्यास करिअर आणि आर्थिक पातळीवर समाधानकारक प्रगती साधता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Equality Index 2026: 28 राज्यांत गोवा नंबर 1! आरोग्य, मूलभूत सुविधा आणि समान संधींच्या निर्देशांकात बाजी

Daily Horoscope: कामाच्या ठिकाणी नवीन संधी ते अचानक धनलाभ! सकारात्मकता आणि संयमाचा दिवस; 'या' राशींसाठी शुक्रवार अत्यंत खास

खरी कुजबुज: राजकीय इच्छा विरुद्ध जनहिताची खरी कसोटी!

Tiger in Surl Charavane: सुर्ला-चरावणेत वाघाने गाईचा फडशा पाडला; राजेंद्र केरकरांचे वन खात्याला संरक्षणासाठी साकडे

57th IFFI Goa: गोव्यात सिनेमाचा उत्सव सुरू! 57 व्या इफ्फीचा 'फादरलॅण्ड'ने होणार दिमाखदार शुभारंभ

SCROLL FOR NEXT