Tiger in Surl Charavane: सुर्ला-चरावणेत वाघाने गाईचा फडशा पाडला; राजेंद्र केरकरांचे वन खात्याला संरक्षणासाठी साकडे

Forest Department: सत्तरी तालुक्यातील सुर्ला-चरावणे परिसरात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे आढळले आहेत.
Forest Department
Tiger in Surl CharavaneDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सत्तरी तालुक्यातील सुर्ला-चरावणे परिसरात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुरावे आढळले आहेत. वाघाने गाईचा फडशा पाडल्याचा व्हिडिओ व छायाचित्रांसह वाघ संरक्षणासाठी वन खात्याने पावले उचलावीत, अशी मागणी करणारे निवेदन वन खात्याला सादर केल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी दिली.

केरकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यासंदर्भात जो व्हिडिओ आणि छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत, त्यावरून राज्यात वाघाचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे म्हादई व्याघ्र प्रकल्प जाहीर करणे आवश्यक आहे. व्याघ्र प्रकल्प जाहीर केल्यास शेतकऱ्यांना जो वन्यजीवांचा त्रास होत आहे, तो होणार नाही.

Forest Department
57th IFFI Goa: गोव्यात सिनेमाचा उत्सव सुरू! 57 व्या इफ्फीचा 'फादरलॅण्ड'ने होणार दिमाखदार शुभारंभ

यापूर्वीही राज्यात वाघ आढळले आहेत आणि मारले गेले आहेत. त्यामुळे वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या भागाची वन खात्याने पाहणी करून वाघाच्या अस्तित्वाची खातरजमा करावी. म्हादई वाचविण्यासाठी व्याघ्र प्रकल्प जाहीर करणे आवश्यक आहे, हे वारंवार समोर आले आहे; परंतु सरकार त्यासाठी सकारात्मक पावले उचलत नाही.

राज्यात वाघाचे अस्तित्व असल्याचे काही घटकांकडून नाकारले जात आहे. परंतु यापूर्वीही वाघाचे अस्तित्व आढळले आहे आणि आता जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Forest Department
FC Goa: फातोर्डाऐवजी आता अटल स्टेडियम एफसी गोवाचे नवे 'होम ग्राउंड'; फेब्रुवारीपासून सामने

‘सीसीटीव्ही’मध्ये वाघ कैद

पर्यावरणप्रेमी केरकर यांनी गोव्यातील वन्यजीव क्षेत्रात वाघ असल्याचे दर्शविणारे सीसीटीव्ही फुटेज उपवनसंरक्षकांकडे सादर केले आहे. यात वाघाने गाईचा फडशा पाडला असून, हा व्हिडिओ साधारण तीस सेकंदांचा आहे. या घटनेमुळे गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.