

पणजी: ५७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवानिमित्त अभिनेते, सिनेचाहत्यांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला असून आज इफ्फीचा शुभारंभ ‘फादरलॅण्ड’ या चित्रपटाने होणार आहे.
चित्रपट महोत्सवाचा उदघाटन सोहळा सायंकाळी ५ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होणार असून यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय सूचना आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. यासोबतच सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि सिनेचाहत्यांची मांदियाळी असेल. यावेळी अभिनेत्री साई पल्लवी, अभिनेता कार्तिक आर्यन तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साई पल्लवी, कार्तिक आर्यनचे प्रमुख आकर्षण
यंदा ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपट, ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात ४५ चित्रपट आणि १४ भव्य प्रीमियर रसिकांना पाहता येतील.
यंदाच्या इफ्फीची ‘सीमारहित कथा’ (स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स) ही संकल्पना आहे.
हा महोत्सव केवळ पणजीपुरता मर्यादित न ठेवता पर्वरी, मडगाव आणि फोंडा येथेही चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल.
विद्यार्थी आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी १४ विशेष सत्रांचे आयोजन.
यंदा स्पेन हा ‘कंट्री ऑफ ऑनर’, तर रशिया हा ‘पार्टनर कंट्री’ (भागीदार देश) आहे.
‘५७‘ आकड्याची लक्षवेधी आसनव्यवस्था
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज कार्यक्रमस्थळी जात संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की यंदाच्या इफ्फीचे अतिशय दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या कार्यालयात ५७ व्या इफ्फीनिमित्त ‘५७’ आकड्याप्रमाणे आसनव्यवस्था करण्यात आली आहे. दोनापावला सर्कल येथे सिनेसृष्टीशी आधारित सजावट करण्यात आली आहे. यंदाचे आयोजन उत्तमरित्या करण्यात आले असून गोमंतकीय जनतेने या महोत्सवात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.