Goa Equality Index 2026: 28 राज्यांत गोवा नंबर 1! आरोग्य, मूलभूत सुविधा आणि समान संधींच्या निर्देशांकात बाजी

Access Inequality Index: देशातील २८ राज्यांमध्ये समान संधी आणि सुविधांच्या उपलब्धतेबाबत गोव्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
Access Inequality Index
Goa Equality Index 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: देशातील २८ राज्यांमध्ये समान संधी आणि सुविधांच्या उपलब्धतेबाबत गोव्याने अव्वल स्थान पटकावले आहे. ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘ॲक्सेस (इन) इक्वॅलिटी इंडेक्स २०२६’मध्ये गोव्याने ०.६८ गुणांसह देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

राज्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या संधींचे या निर्देशांकातून सकारात्मक चित्र समोर आले आहे. या निर्देशांकात गोव्याने विशेषतः मूलभूत सुविधा आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिक्षण क्षेत्रातही राज्याने दुसरे स्थान मिळविले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक विकासच नव्हे, तर नागरिकांना आवश्यक सुविधा आणि सार्वजनिक सेवांचा लाभ मिळवून देण्याच्या बाबतीतही गोवा आघाडीवर असल्याचे या निष्कर्षातून अधोरेखित झाले आहे.

Access Inequality Index
57th IFFI Goa: गोव्यात सिनेमाचा उत्सव सुरू! 57 व्या इफ्फीचा 'फादरलॅण्ड'ने होणार दिमाखदार शुभारंभ

लसीकरणातही उत्तम प्रगती

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीही समाधानकारक असल्याचे निर्देशांकातील आकडेवारी दर्शविते. राज्यातील ९३.८ टक्के मुलांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. बालकांचे आरोग्य, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लसीकरणाच्या बाबतीत गोव्याने चांगली प्रगती केल्याचे यातून स्पष्ट होते. आरोग्य सुविधांचा लाभ समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना या कामगिरीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सर्व शाळांमध्ये इंटरनेट

शिक्षण क्षेत्रात गोव्याने देशात दुसरे स्थान मिळविले असून, राज्यातील शाळांमध्ये इंटरनेटची शंभर टक्के उपलब्धता असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. इंटरनेट सुविधेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधने आणि डिजिटल माहितीपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होत आहे.

सुरक्षित जल आणि निवारा

या अहवालानुसार, गोव्यातील ९१.९ टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच राज्यातील ९० टक्के नागरिक पक्क्या घरांमध्ये वास्तव्यास आहेत. पिण्याचे पाणी आणि सुरक्षित निवारा या जीवनावश्यक सुविधांची उपलब्धता राज्याच्या सामाजिक विकासातील महत्त्वाचा घटक ठरली आहे.

समान सुविधांच्या लाभाचे आव्हान

एकूणच मूलभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांतील कामगिरीमुळे गोव्याने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडी मिळविली आहे. ‘समान प्रवेश, अधिक चांगल्या संधी आणि अधिक सक्षम गोवा’ या संकल्पनेला या निर्देशांकातील निष्कर्षांमुळे बळ मिळाले आहे. मात्र, या क्रमवारीतील आघाडी कायम राखण्याबरोबरच उर्वरित नागरिकांपर्यंतही सुविधांचा समान लाभ पोहोचविण्याचे आव्हान राज्यासमोर आहे.

सुरक्षित जल आणि निवारा

या अहवालानुसार, गोव्यातील ९१.९ टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच राज्यातील ९० टक्के नागरिक पक्क्या घरांमध्ये वास्तव्यास आहेत. पिण्याचे पाणी आणि सुरक्षित निवारा या जीवनावश्यक सुविधांची उपलब्धता राज्याच्या सामाजिक विकासातील महत्त्वाचा घटक ठरली आहे.

Access Inequality Index
FC Goa: फातोर्डाऐवजी आता अटल स्टेडियम एफसी गोवाचे नवे 'होम ग्राउंड'; फेब्रुवारीपासून सामने

मूलभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रात गोव्याने उल्लेखनीय प्रगती केली असून, शिक्षण क्षेत्रातही देशात दुसरे स्थान मिळविले आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा, घरे, आरोग्यसेवा तसेच शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्याने महत्त्वपूर्ण यश प्राप्त केले आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.