10 May 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: संडे ठरणार मालामाल! ग्रह-ताऱ्यांची विशेष कृपा, 'या' राशींच्या घरात पैशांचा पाऊस, उघडणार प्रगतीचे सर्व दरवाजे

10 May 2026 Horoscope: आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून रविवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Sameer Amunekar

आज ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून रविवारचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे, कारण आज दुपारी ३ वाजेपर्यंत अष्टमी तिथी असून त्यानंतर 'शीतलाष्टमी' व्रत पाळले जाणार आहे. तसेच, रात्री उशिरापर्यंत 'ब्रह्म योग' आणि 'धनिष्ठा नक्षत्र' यांचा विशेष प्रभाव राहील. आजपासून 'पंचक' देखील सुरू होत असल्याने काही राशींना सावधगिरी बाल्वणे आवश्यक आहे, तर काहींसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

मेष ते कर्क: आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. त्यांनी पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत जास्त उदारपणा दाखवणे महागात पडू शकते.

दुसरीकडे, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार लाभदायक ठरेल. त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र रागावर नियंत्रण ठेवणे अनिवार्य आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना कुटुंबात पाहुण्यांचे आगमन झाल्याने आनंदाची बातमी मिळेल, तर कर्क राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल.

सिंह ते वृश्चिक: करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठा सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराट घेऊन आला आहे. मालमत्तेशी संबंधित प्रलंबित कामे मार्गी लागतील. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये आज आत्मविश्वासाची कमतरता भासणार नाही, त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

मात्र, तुळ राशीच्या लोकांनी आज कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नये. गुंतवणुकीच्या योजना आखताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नशिबाची दारे उघडतील, पण त्यांनी बाहेरच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी.

धनु ते मीन: प्रगती आणि मानसिक शांतता धनु राशीच्या व्यक्तींना आज मानसिक शांतता लाभेल आणि वाचनात त्यांची रुची वाढेल. मकर राशीच्या लोकांसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती फायदेशीर ठरेल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज घरातील मोठ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही नवीन काम सुरू करू नये, तसेच कोणालाही भावनेच्या भरात वचन देणे टाळावे. शेवटी, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला प्रसन्नता वाटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT