Rashi Bhavishya Dainik Gomatnak
Horoscope

Rashi Bhavishya: नोकरीची संधी चालून येणार, कर्ज फिटणार; 'या' राशींच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य

10 February Horoscope: १० फेब्रुवारी २०२६ हा दिवस सर्व १२ राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींना आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

Sameer Panditrao

१० फेब्रुवारी २०२६ हा दिवस सर्व १२ राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींना आर्थिक लाभाचे संकेत आहेत, तर काहींना आरोग्य व नातेसंबंधांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आजचा दिवस कुणासाठी उत्साहवर्धक, तर कुणासाठी संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो.

मेष
आजचा दिवस मान-सन्मान वाढवणारा आहे. सरकारी कामकाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत लोकांना गौरव मिळण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीमुळे मन चिंतेत राहील.

वृषभ
हौस-मौज आणि आरामदायी गोष्टींवर खर्च होईल. दडलेले उत्पन्न समोर येण्याची शक्यता आहे. जोडीदारासाठी नव्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

मिथुन
उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील, पण खर्चही वाढतील. मित्रांसोबत सहलीचा बेत ठरू शकतो. अविवाहितांसाठी नवीन ओळखीचे योग आहेत. वडीलधाऱ्यांशी वाद टाळावा.

कर्क
आज लाभाचा दिवस आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरात आनंदाची बातमी मिळू शकते. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह
कष्टाचे काम करावे लागेल. सामाजिक जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदारासोबत फिरण्याचा बेत ठरू शकतो. सहकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता असल्याने सावध राहा.

कन्या
अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात दिलासा मिळेल. कुटुंबातील मंगलकार्याचे निमंत्रण येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

तूळ
परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. भागीदारीत सावधगिरी बाळगा. प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळू शकते.

वृश्चिक
दिवस संमिश्र फलदायी आहे. काही कामांत निराशा येऊ शकते. धार्मिक कार्यात मन रमेल. जुने कर्ज फेडण्यास यश मिळेल.

धनु
व्यवसायाला गती मिळेल, पण खर्च वाढतील. अचानक प्रवास करावा लागू शकतो. दिखाव्यापासून दूर राहणे हितावह ठरेल.

मकर
धावपळीचा दिवस आहे. मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होऊ शकतात. मेहनतीचे प्रमाण जास्त राहील, पण अपेक्षित फळ उशिरा मिळेल.

कुंभ
बँकिंग व आर्थिक क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला आहे. नोकरीच्या संधी मिळू शकतात. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन
भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ संभवतो. वैवाहिक आयुष्यात काही तणाव निर्माण होऊ शकतात, पण कुटुंबाचा पाठिंबा लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT