New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: 'झुआरी'वरील मनोऱ्याचे काम 2031 पर्यंत पूर्ण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

Zuari bridge tower work: नव्‍या झुआरी पुलावरील मनोरा तसेच फिरत्‍या रेस्‍टॉरंटचे काम ३१ मार्च २०३१ पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्‍ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नव्‍या झुआरी पुलावरील मनोरा तसेच फिरत्‍या रेस्‍टॉरंटचे काम ३१ मार्च २०३१ पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्‍ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे. दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता.

नव्‍या झुआरी पुलावर बांधण्‍यात येत असलेल्‍या मनोरा आणि फिरत्‍या रेस्टॉरंटची आवश्यकता असण्याची कारणे कोणती, मनोरा आणि रेस्टॉरंटच्या बांधकामासाठीचा अंदाजित खर्च किती आहे, मनोरा आणि रेस्‍टॉरंट पाहण्‍यासाठी येणाऱ्यांच्‍या वाहनांसाठी पार्किंगची जागा कोठे असेल आणि बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होईल, असे प्रश्‍‍न फर्नांडिस यांनी विचारले होते.

त्‍यावर झुआरी पुलावरील मनोरा तसेच फिरत्‍या रेस्टॉरंटचे बांधकाम ३१ मार्च २०३१ पर्यंत पूर्ण होईल, असे मंत्री गडकरी यांनी म्‍हटले आहे. पुलावरील मनोरा तसेच फिरत्‍या रेस्‍टॉरंटचे काम गोवा सरकारच्‍या विनंतीवरून करण्‍यात येत आहे. हा प्रकल्‍प सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्त्‍वावर (पीपीपी) उभारण्‍यात येत असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT