Zuari Bridge concrete collapse Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नव्या झुवारी पुलाचे काँक्रीट कोसळले! वाहतूक कमी असल्याने दुर्घटना टळली, निकृष्ट दर्जाच्या कामाची चर्चा

Zuari Bridge concrete collapse: पुलाच्या ऍक्सपांशन जॉईंट (विस्तारित जोडणी) भागात भरलेले काँक्रीट कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Sameer Panditrao

तिसवाडी: डिसेंबर २०२२ मध्ये उद्‍घाटन केलेल्या नवीन झुवारी पुलाचा काँक्रीटचा भाग रस्त्यावर कोसळले, परंतु सुदैवाने जीवतहानी झाली नाही. सदर प्रकार आगशी पोलिस ठाण्याच्या समोरच घडल्याने पुन्हा एका निकृष्ट दर्जाचे काम झाल्याच्या चर्चेला वाव मिळाला आहे.

पुलाच्या ऍक्सपांशन जॉईंट (विस्तारित जोडणी) भागात भरलेले काँक्रीट कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दररोज या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने आज वाहतूक होत नसलेल्या वेळेत हा प्रकार घडला. आगशी येथे नक्षत्र करणारे कलाकार अँथनी रॉड्रिग्ज यांनी या प्रकारावर प्रकाश टाकला.

मी नक्षत्रांचे काम करत असताना मोठा आवाज ऐकू आला, म्हणून धावत रस्त्यावर आलो. तेव्हा तेथे मला काँक्रीटचा मोठा भाग कोसळलेला दिसला. नेहमी मला पाव देण्यासाठी याच वेळेला पोदेर येतो, परंतु आज सुदैवाने तो माझ्यासाठी थांबला नाही, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

पुलाच्या जॉईंटवर असे हवामानानुसार होणारे बदल रस्त्याला सहन करता येतील, यासाठी ठेवले जातात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे रस्ता विस्तारतो आणि हिवाळ्यात रस्ता संकुचित होतो, याच कामासाठी ऍक्सपान्शन जॉईंट असतात. परंतु त्यात काँक्रीट घालणे, हे वाहतूकदारांसाठी आणि पुलासाठी धोकादायक आहे.
कर्नल मिलिंद प्रभू, रस्ता तज्ज्ञ
नवीन झुवारी पुलाच्या विस्तारित जोडणीतून काँक्रीट पडणे, हे मानवी जीवनासाठी आणि संरचनेसाठी गंभीर सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण करते. तसेच कामाच्या गुणवत्तेवरही प्रकाश टाकते. सार्वजनिक बांधकाम खाते आणि एमओआरटीएचकडून तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
एल्विस गोम्स, नेता, काँग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT