Zuari Bridge: 22 पासून ‘झुआरी’ची दुसरी लेन सेवेत; लोड टेस्टिंग पूर्ण

Zuari Bridge: 224 केबल्स, 100 वर्षे आयुर्मान
New Zuari Bridge:
New Zuari Bridge:Dainik Gomatak

Zuari Bridge: झुआरी नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे दुसऱ्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या लेनमध्ये एकूण 224 केबल्स वापरण्यात आले असून दोन्ही बाजूंनी 112 केबल्स आहेत. हे केबल स्टेड ब्रीज असून ते अत्यंत मजबूत आहे. त्याचे आयुष्य 100 वर्षांहून अधिक आहे.

New Zuari Bridge:
Goa Traffic Issue: वाहतुकीत अडकली रुग्णवाहिका

हा पूल 22 डिसेंबर रोजी लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात या लेनचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी संबंधित अधिकारी आता कामाला लागले आहेत.

यासंदर्भात, दिलीप बिल्डकॉन कंपनीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वर देशमुख म्हणाले, की या प्रकल्पासाठी 545.4 कोटी रुपये खर्च झालेला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या नवीन झुआरी पुलाची पहिली लेन लोकांसाठी खुली करण्यात आली होती.

आता दुसरी लेनही सज्ज आहे. अंत्यत अत्याधुनिक पद्धतीने याचे बांधकाम करण्यात आले आहे. सर्वप्रथम आम्ही कंपोझिट स्ट्रक्चरची उभारणी केली होती. त्यानंतर बिटुमिनस काँक्रिट टाकणे, पुलावर रोषणाई, क्रॅश बॅरियर्स फिक्सिंग, ब्रीज लोड टेस्टिंग अशा चाचण्याही घेतल्या.

तब्‍बल 3 हजार मजूर

या पुलाच्या कामासाठी जवळपास 3 हजार मजूर लागले. याशिवाय अभियंते व इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वाधिक मजूर हे ओडिशा व उत्तर प्रदेश येथून आणले गेले होते. हे मजूर गेले कित्येक महिने या नवीन झुआरी पुलाच्या कामात दिवस-रात्र व्यस्त होते.

अवजड वाहनांची वेगमर्यादा

पुलाची चाचणी यशस्वी झाली असून या पुलावरून जाण्यासाठी अवजड वाहनांना ताशी 80 किलोमीटर वेगमर्यादा तर दुचाकीला ताशी 60 किलोमीटर वेगमर्यादा ठेवण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com