Police Stop Goa Forward Public Meeting Dainik Gomantak
गोवा

काणकोणमध्ये गोंधळ! पोलिसांनी थांबवली गोवा फॉरवर्डची सभा, विजय सरदेसाई संतापले, म्हणाले, 'आम्ही त्यांना घाबरणार नाही...'

Police Stop Goa Forward Public Meeting: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाची काणकोण येथील सभा पोलिसांनी अचानक हस्तक्षेप करत थांबवली.

Manish Jadhav

काणकोण: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाची काणकोण येथील सभा पोलिसांनी अचानक हस्तक्षेप करत थांबवली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या हस्तक्षेपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पोलिस आणि सरदेसाई यांच्यात शाब्दिक चकमकही झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांचा वापर करुन आमची सभा थांबवल्याचा गंभीर आरोप सरदेसाई यांनी सरकारवर केला. सरकारची ही कृती लोकशाहीविरोधी असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

नेमकं काय झालं?

गोवा फॉरवर्ड पक्षाची (Goa Forward Party) काणकोणमधील जिल्हा पंचायत मतदारसंघातील गावडोंगरी येथे सभा सुरु होती. मात्र अचानक पोलिसांनी हस्तक्षेप करत ही सभा थांबवली. पोलिसांनी थेट स्टेजवर प्रवेश केला आणि माईक काढून टाकत ही सभा जबरदस्तीने थांबवली. यामुळे सभेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सत्ताधारी पक्षाचे लोकशाहीविरोधी वर्तन आता उघडपणे समोर आले." सरदेसाई यांनी नमूद केले की, यापूर्वी गोवा फॉरवर्डचे बॅनर फाडण्यात आले आणि आता गावडोंगरी येथील सभा रोखण्यात आली. "या कृतीतून विश्वसनीय विरोधी पक्षाची भाजपला असलेली स्पष्ट भीती दिसून येते," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पोलिसांविरुद्ध तक्रार करणार

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, पक्ष या घटनेबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करेल. काणकोणमधील सभेला बंदी घालण्यास जबाबदार असलेल्या निवडणूक अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध ही तक्रार केली जाईल. एवढच नव्हेतर त्यांच्यावर तात्काळ कारवाईचीही मागणी केली जाईल.

लोकशाही मूल्यांसाठी लढणारच

सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, अशा दबावाला आम्ही घाबरणार नाही. आम्ही कोणत्याही धमक्यांना बळी पडणार नाही. आम्ही गोव्यासाठी (Goa), लोकशाही मूल्यांसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या राजकीय जीवनात मुक्तपणे सहभागी होण्याच्या हक्कांसाठी उभे राहणे सुरुच ठेवू."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live Updates: डिचोली हादरले! बाजार परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय

AFC Champions League 2: एफसी गोवाचा कडू शेवट! 2025 चे मैदान पराभवाने गाजले; आता भारतीय फुटबॉलचे भविष्यही अधांतरी

Vasco Market: मुरगाव पालिकेच्या नियमांना हरताळ, वास्को मार्केट बनलं 'अडथळ्यांचं आगर'; कारवाईच्या इशाऱ्यानंतरही विक्रेत्यांची दादागिरी सुरुच

Dabolim Airport Touts: गुपचूप प्लॅन, धडाकेबाज ॲक्शन! दाबोळी विमानतळावर 20 दलालांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पळणाऱ्यांची धरपकड सुरु

Goa Shellfish Shortage: बेतूलच्या मच्छीमारांवर उपासमारीची टांगती तलवार! साळ नदीतील गाळ ठरतोय 'शेल फिश'साठी कर्दनकाळ

SCROLL FOR NEXT