Zenito Cardozo Dainik Gomantak
गोवा

Zenito Cardozo: 10 नोव्हेंबरपर्यंत कोर्टाला शरण या! सदोष मनुष्यवध प्रकरणात गुंड जेनिटोच्या अडचणी वाढल्या

Zenito Cardozo 2009 Siridao beach case: म्हापसा न्यायालयाने जेनिटोला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर मारहाण प्रकरणात अटकेत असणारा गुंड जेनिटो कार्दोज याच्या अडचणी वाढल्या आहेत. २००९ सालच्या शिरदोण येथील सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात त्याला झालेली तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तसेच, १० नोव्हेंबरपर्यंत त्याला कोर्टाला शरण येण्याचे आदेश दिले आहेत.

शिरदोण येथे संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा उर्फ मिरांड याच्या सदोष मनुष्यवध प्रकरणात जेनिटोला दोषी ठरविण्यात आले होते. २००९ साली ही घटना घडली होती. याप्रकरणात गुंड जेनिटोला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली असून, जेनिटोला १० नोव्हेंबरपर्यंत कोर्टाला शरण येण्याचे आदेश देण्यात आलेत.

दुसरीकडे रामा काणकोण प्रकरणात देखील जेनिटोला दिलासा मिळालेला नसून, त्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. जेनिटोसह न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी शुक्रवारी समाप्त झाली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कोठडी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. पणजी सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे.

दरम्यान, २००९ साली शिरदोण बीचवर झालेल्या गँगवॉरमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. यात जेनिटोचा ग्रुप आमि मिरांड गँग यांच्या वाद झाला होता. बीचवर एकमेकांवर काचेच्या बाटल्या, चाकू भिरकावल्याने यात दोघांचा मृत्यू झाला होता. यात जखमी झालेल्या संतोष कालेल याचा जागीच मृत्यू झाला होता तर फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा उर्फ मिरांड याचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

याप्रकरणी जेनिटो याच्यासह इतर दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. म्हापसा न्यायालयाने जेनिटोला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

Cooch Behar Trophy: गोव्याची विजयी घोडदौड! मिहीर कुडाळकरच्या फिरकीच्या जाळ्यात आसामचे फलंदाज अडकले; दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 215 धावांनी दिली मात

Solar Village Goa: सौर पॅनल बसवा 1 कोटी मिळवा! 'पीएम सूर्यघर' योजनेतून गोव्याला खास भेट; प्रत्येक जिल्ह्यात 'आदर्श सौर गाव' निर्माण करण्याचा निर्णय

Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

SCROLL FOR NEXT