BMW ची दोन दुचाकींना धडक, 3 जखमी, महाराष्ट्रातील चालकाविरोधात गुन्हा; कळंगुटमध्ये झाला होता तणाव

Goa Accident News: स्थानिक तसेच जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत, संशयिताच्या अटकेची मागणी केली.
BMW hits bikes Goa | Maharashtra driver arrested Goa
BMW accident in CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कळंगुटमध्ये रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बीएमडब्ल्युने दोन दुचाकींना धडक दिल्याने तीनजण जखमी झाले आहेत. या अपघातबाबत ठाणे, महाराष्ट्रातील चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाईकवाडा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

कळंगुट पोलिसांनी याबाबत विजय बुरुड (वय २९, रा. ठाणे, महाराष्ट्र) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात तिघेजण जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता.

BMW hits bikes Goa | Maharashtra driver arrested Goa
Vinoo Mankad Trophy: प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आला अंगलट! विदर्भाची गोव्यावर सहज मात; 161 धावांत गुंडाळला डाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विजय बागा सर्कल येथून कळंगुटच्या टीटोज लेनच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाने दोन दुचाकींना जोराची धडक दिली. यात तिघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, चालकाने अपघातस्थळावरुन पळ काढला.

स्थानिक तसेच जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत, संशयिताच्या अटकेची मागणी केली. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसोबत देखील जमावाने हुज्जत घातली तसेच संशयितावर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

BMW hits bikes Goa | Maharashtra driver arrested Goa
T20 Tournament: झारखंडच्या महिला पडल्या भारी! गोव्याचा 7 विकेट राखून पराभव; फलंदाजीत निराशाजनक कामगिरी

दरम्यान, कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. चालकाला उशीरा रात्री चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com