Zen Technologies In Goa:  Goa News
गोवा

Zen Technologies In Goa: तुयेत ड्रोनविरोधी प्रणालीची निर्मिती

Zen Technologies In Goa: 50 कोटींची गुंतवणूक : प्रकल्पात 800 जणांना थेट रोजगार

दैनिक गोमन्तक

Zen Technologies In Goa: रक्षण मंत्रालयाकडून तब्बल सव्वाचारशे कोटी रुपयांचे कंत्राट मिळालेली ‘झेन टेक्नॉलॉजीस’ ही कंपनी संरक्षणविषयक उपकऱणे तयार करण्यासाठीचे संशोधन करण्यासाठी तुये येथील प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक्स सिटीमध्ये प्रकल्प सुरू करणार आहे. या कंपनीला आज तेथील भूखंडाची कागदपत्रे सरकारने दिली.

50 कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पात 800 जणांना थेट रोजगार मिळणार आहे. कंपनीचा संशोधन व विकास विभाग तुये या ठिकाणी उभारला जाणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

संरक्षणविषयक प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे सिम्युलेटर्स, ड्रोन, ड्रोनविरोधी प्रणाली ही कंपनी तयार करते. पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुये येथे भूखंडांसाठी वाटपपत्र सुपूर्द केले.

सात वर्षांपूर्वी 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्लस्टरचे उद्‍घाटन केले होते. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुयेची अंमलबजावणी प्राधिकरण डॉ. चंद्रकांत शेट्ये अध्यक्षतेखाली असलेल्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे आहे.

तुये प्रकल्प 5 लाख 97 हजार 125 चौरस मीटरवर व्यापला आहे. भूखंड वाटप सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. अनेक हातांना येथे रोजगार मिळेल.

खंवटे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुये प्रकल्प सरकार आणि उद्योग यांच्यातील समन्वयाचे उदाहरण आहे. हे इलेक्ट्रॉनिक उत्पादनाचे केंद्र म्हणून गोव्याचा पाया मजबूत करते. त्यासोबतच इतर राज्यांसाठी अनुकरणीय देखील ठरते.

यापूर्वी केंकरे जनरेटर्स सेल्स ॲण्ड सर्व्हिस, समनवी डिजिमीडिया आर्ट ॲण्ड सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, मेगा इलेक्ट्रिकल्स, सोल इनोकॅब प्रा. लि., प्रिस्टाईन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि नाटेकर इंडस्ट्रीज यांना सरकारने तुये येथे भूखंड दिले आहेत.

youtube.com/watch?v=cGQJ13egMlA

औद्योगिक भूखंड, ५४० रुपये प्रतिचौरस मीटर आणि मायक्रो इंडस्ट्रियल झोन भूखंड १ हजार २०० रुपये प्रतिचौरस मीटर दराने दिले जात आहेत. नूतनीकरणाच्या पर्यायासह ३० वर्षांच्या मुदतीसाठी भाडेपट्ट्याने हे भूखंड दिले जात आहेत. हे दर देशातील सर्वांत कमी औद्योगिक दर आहेत.

यांचे होणार उत्पादन

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तुये येथे दूरसंचार उत्पादने, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्य आणि वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स, स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स आदींचे उत्पादन होईल, असे सरकारला वाटते.

तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांची मी प्रशंसा करतो.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT