Yellow Alert In Goa: पुढील तीन दिवस पावसाची शक्यता; ‘इफ्फी’मध्ये व्यत्यय शक्य

Yellow Alert In Goa: वाळपई, तांबडी सुर्लाला ‘अवकाळी’ने झोडपले
Yellow Alert In Goa
Yellow Alert In GoaDainik Gomantak

Yellow Alert In Goa: हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने राज्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार आज वाळपई, तांबडी सुर्ला भागाला दुपारी 3 आणि सायं. 6 च्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने झोडपले.

Yellow Alert In Goa
Goa Accident Death: अपघात बळींचा आकडा अडीचशे पार

या भागात जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने अचानक हजेरी लावल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. आज (शुक्रवारी) तुळशी विवाह त्यामुळे वाळपई बाजार आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची मोठी वर्दळ होती.

मात्र, पाऊस सुरू झाल्याने लोकांची त्रेधातिरपीट उडाली. सखल भागात तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तुळशी विवाहानिमित्त घरोघरी अंगण सारवले होते, तसेच दारोदारी तुळशी वृंदावने रंगविली होती, रांगोळ्या रेखाटल्या होत्या. मात्र, अवकाळी पावसाने अनेकांचा हिरमोड केला. तसेच पुढील तीन दिवसही राज्यात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

youtube.com/watch?v=cGQJ13egMlA

थंडी गायब

एरवी राज्यात नोव्हेंबरच्या मध्याला थंडी जाणवू लागते; परंतु यंदा अजूनही थंडीचा थांगपत्ताच नाही. उलट राज्यातील आर्द्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उष्मा वाढू लागला आहे. शुक्रवारी पणजीत कमाल ३३.६ तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

‘इफ्फी’मध्ये व्यत्यय शक्य

हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस म्हणजेच २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली असून या काळात ‘यलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे सध्या राज्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये काहीसा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com