Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापशात युवा कोकणी साहित्य संमेलन

उद्या उद्‍घाटन: ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालयात आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News: गोवा कोकणी अकादमी व ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय आसगाव, म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने 22 वे युवा कोकणी साहित्य संमेलन 17 व 18 मार्च 2023 यादरम्यान, याच वरील विद्यालयात आयोजिल्याची माहिती गोवा कोकणी अकादमीच्या सदस्य सचिव मेघना शेटगांवकर यांनी दिली.

बुधवारी (ता.15) ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिलीप आरोलकर, प्रा. प्रशांती तळपणकर व प्रा. पुरूषोत्तम वेर्लेकर हे उपस्थित होते.

17 रोजी सकाळी 10 वा. महाराष्ट्रातील सुविख्यात उर्दू व इंग्रजी युवा साहित्यिक रहमान अब्बास यांच्या हस्ते कोकणी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन होईल.

संमेलनाध्यक्ष म्हणून पत्रकार मार्किस गोन्साल्वीस तर विशेष अतिथी ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष अरुण साखरदांडे, उपाध्यक्ष वसंत सावंत, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिलीप आरोलकर उपस्थित राहतील.

स्वागताध्यक्षपदी डॉ. दिलीप आरोलकर, युवा लेखक प्रा. पुरूषोत्तम वेर्लेकर यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती प्रा. प्रशांती तळपणकर यांनी दिली.

दिलीप आरोलकर म्हणाले, संमेलनाच्या संपूर्ण परिसराला नागेश करमली नगर असे नाव दिले असून प्रमुख मंडपास नारायण मावजो यांचे नाव दिले. तर व्यासपीठ व सभागृहांना महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक एडवर्ड डिलिमा, प्रकाश पाडगांवकर, जयमाला दणायत, रजनी भेंब्रे, रेवणसिद्ध नायक यांचे नावे दिली आहेत.

मुलाखत कार्यक्रम

पडवेर या अभिनव कार्यक्रमात लेखक दत्ता दामोदर नायक व श्रीमती नमन साखरदांडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. सान्वी खांडेपारकर व गौरांग भांडिये या मुलखती घेतील. त्यानंतर खुल्या प्रांगणात दोघेही लेखक युवा लेखकांशी दिलखुलास चर्चा करतील. तसेच युवा साहित्य पुरस्कार विजेता नरेश नाईक यांची युवा लेखक गोरख शिरसाट मुलाखत घेतील.

विशेष कार्यशाळा

18 रोजी सकाळी 9.30 वा. कविता, कथा, ब्लॉगिंग व बालसाहित्य या विशेष कार्यशाळेत श्रीमती हेमा नायक, श्रीमती मीना काकोडकर, श्रीमती राधा भावे, नारायण महाले, लुझेस गोम्स, श्रीमता रत्नमाला दिवकर, रमेश घाडी, गोपीनाथ गावस, चेतन आचार्य, सुभाष कामळकर, अन्वेषा सिंगबाळ, युगांक नायक हे साहित्यिक युवा लेखकांना मार्गदर्शन करतील.

शनिवारी समारोप

18 रोजी दुपारी 2.30 वा. संमेलनाचा समारोप समारंभ. प्रा. भास्कर नायक खास अतिथी म्हणून असतील. तर संमेलनाध्यक्ष मार्किस गोन्साल्वीस, स्वागताध्यक्ष डॉ. दिलीप आरोलकर, कार्याध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम वेर्लेकर व कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष वसंत सावंत यांच्या उपस्थित समारोप होईल. या संमेलनाला 150 प्रतिनिधींची नोंदणी झाल्याची माहिती प्रशांती तळपणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: कॉंग्रेस-फॉरवर्ड युतीस 27 जागा शक्य! विधानसभेसंदर्भात पाटकर यांचा अंदाज; बुथनिहाय विश्लेषण करणार

Navelim: पराभवातही भाजपचा फायदा! नावेली-दवर्लीत मतांमध्‍ये वाढ, राजकीय कौल बदलतोय? विधानसभा निवडणुकीकडे लक्ष

Arambol: हरमलमध्‍ये ‘बाद’ मतांनी केला भाजप-मगो युतीचा घात! 145 मते अवैध; अवघ्‍या ५४ मतांनी अपक्ष उमेदवाराची सरशी

Goa Politics: खरी कुजबुज; काय सांगता ? सरकारी नोकरी नाकारली!

Goa Politics: 'विधानसभेला काँग्रेस आमदार फुटतील, भाजप-मगोपला 22 जागा मिळतील'! ढवळीकरांचे भाकित; कार्यकर्त्यांवर उधळली स्तुतीसुमने

SCROLL FOR NEXT