Goan Instrument | Ghumat Dainik Gomantak
गोवा

स्त्रीशक्तीचा तालोत्सव! पुरुषांच्या मक्तेदारीवर सशक्त थाप देणारे गोव्यातील घुमट आरती मंडळ

Ghumat Aarti: तळावली- फोंडा येथील ‘युवा कला मोगी महिला घुमट आरती मंडळाने' चार वर्षातच बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

YUVA KALA MOGI GHUMAT AARTI MANDAL TALAULIM 

श्रावण जवळ आला की गणेश चतुर्थीची चाहूल लागते आणि घुमट आरतीच्या तालमींचे आखाडे ठिकठिकाणी लयीत गाजायला लागतात. काही वर्षांपूर्वी घुमट आरती ही फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. तडफेने थाप टाकून घुमटातून जोशपूर्ण बोल काढणे स्त्रीच्या नाजूक हातांना शक्य होईल का या प्रश्नावर बरीच वर्षे तगून राहिलेली ही मक्तेदारी, घुमटावर तिची सशक्त थाप पडताच सहज कोसळून पडली.

तळावली- फोंडा येथील ‘युवा कला मोगी महिला घुमट आरती मंडळ’ चार वर्षांपूर्वीच स्थापन झाले. पण चार वर्षातच या मंडळाने बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली आहे. महिला घुमट आरती स्पर्धेत भाग घ्यावा या इच्छेने एकत्र आलेल्या या मुलींनी घुमट आरतीमध्ये असे कौशल्य मिळवले की आता त्यांना राज्याबाहेरील आमंत्रणेही खुणावू लागली आहे. 

ज्यावेळी या आरती मंडळाची सुरुवात झाली त्यावेळी या साऱ्या मुलींचा घुमट आरतीशी परिचय नव्यानेच होत होता. विघ्नेश नाईक यांच्याकडून त्यांनी  सुरुवातीला घुमट आरती सादरीकरणाचे मार्गदर्शन घेतले. त्याशिवाय स्थानिक युवक वादकांनीही त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्यापैकी अवघ्याच मुलींना गायन-वादनाचे प्राथमिक ज्ञान होते तर इतर मुली या क्षेत्रात नवीनच होत्या.

Ganeshotsav 2024 |Ganesh Chaturthi 2024

या संचामद्ध्ये सुरुवातीला १२ मुली होत्या. (स्पर्धेसाठी १२ गायक-वादकांचा संच असावा असा नियम आहे.) परंतु जसजसे या मंडळाचे नाव पंचक्रोशीत होऊ लागले तसतसे इतर मुलीही या ग्रुपकडे आकर्षित झाल्या. आज या ग्रुपमध्ये १६-१७ मुली आहेत. स्पर्धा सोडल्यास इतर ठिकाणी संचातील सर्व मुली आरती सादरीकरणात सामील असतात.

श्रावण महिन्यात तसेच गणेशोत्सवाच्या दिवसात हे मंडळ पूर्णतः व्यस्त असते. गेल्या वर्षी या दिवसात या मंडळाने  सुमारे 30 घुमट आरती गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी सादर केल्या होत्या. यंदा हा आकडा नक्कीच वाढणार आहे. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी सुमारे एक महिना आधी त्यांच्या तालमी सुरू होतात. रोज संध्याकाळी ७ ते ९ असे दोन तास नियमितपणे त्यांच्या तालमी चालतात. तळावली येथील हे मंडळ असले तरी त्यांच्या काही सदस्या कुंडई, साकोर्डे अशा दूरच्या गावातून येतात. 

Goa Ghumat Aarti|Goan Instrument Ghumat

कार्यक्रम किती दूर अंतरावरील गावात आहे यानुसार या घुमट आरती मंडळाचे मानधन ठरते मात्र पुरुषांइतक्याच तडफेने व कौशल्याने आरती सादर करून देखील पुरुषांच्या आरती मंडळांना मिळणाऱ्या मानधनाइतके मानधन अजून महिला घुमट आरती मंडळाला मिळत नाही हे सत्य आहे. या मंडळाची एक सदस्या सांगते, ‘आरती सादरीकरणातून जो आनंद आम्हाला मिळतो तीच आमची ऊर्जा आहे.’

या संचातील साऱ्या मुलींना त्यांच्या घरातून मिळणारे पाठबळ हा त्यांचा प्रमुख आधार आहे. या साऱ्या मुली एकाच गाडीतून एकत्रितपणे कार्यक्रमाला जातात. त्यांच्या  म्हणण्यानुसार, प्रवासातील हा त्यांचा वेळ आनंदाचा असतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना गाडीतच त्यांची एक हलकी तालीम होते आणि कार्यक्रम आटोपून परत येताना गाडीत त्यांची मौज चालूच असते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT