Yuri Alemao on Situation of schools in state Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: राज्यात 92 शाळा असुरक्षित; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक मंदिरे सांभाळावीत...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव; 1315 पैकी 663 शाळांचे अजूनही स्ट्रक्चरल, सेफ्टी ऑडिट नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

Yuri Alemao On School conditon in state: भाजप सरकारचे चुकीचे प्राधान्यक्रम आणि इव्हेंट आयोजनाचे फॅड यामुळे राज्यात 92 शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या स्थितीत आहेत आणि 1315 पैकी 663 शाळांचे सरकारने अजूनही स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट केलेले नाही.

शासनाच्या दिवाळखोरीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून विविध शाळांचे 8.06 कोटींचे भाडे अदा करण्यात आलेले नाही. राज्यातील 20 शाळा आणि एक उच्च माध्यमिक विद्यालय जीर्ण अवस्थेत आहेत, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

शिक्षण खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मारके निर्माण करण्यावर आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर सार्वजनिक निधी खर्च करण्यापेक्षा शैक्षणिक मंदिरांचा सांभाळ व निर्माण यावर भर द्यावा.

इंटरनॅशनल सद्गुरू गुरुकुलम मिडल स्कूल कुंडई, गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स आणि स्वामी ब्रह्मानंद महाविदयालय यासह विविध शाळा आणि महाविद्यालयांचे भाडे "निधीच्या कमतरतेमुळे" भरलेले नाही अशी माहीती सरकारनेच विधानसभेत दिली आहे असे युरी आलेमाव यांनी उघड केले.

गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने तीन वर्षांपूर्वी हाती घेतलेली दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची होती हे सदर शाळांच्या इमारतींची परत एकदा दुरुस्ती करण्याची स्ट्रक्चरल ऑडिट अहवालातील शिफारसीवरून समोर आली आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.

विविध शाळांच्या स्ट्रक्चरल व सुरक्षा ऑडिट अहवालात अनेक शाळांना कुंपणाच्या भिंती नाहीत, अनेक शाळांच्या छताची तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे, शाळांमध्ये योग्य अग्निसुरक्षा उपकरणे नाहीत आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता नाही हे नमूद केले आहे.

सुरक्षा ऑडीत अहवालात स्पष्ट शिफारस करुनही, एका शाळेच्या छताच्या अगदी जवळ असलेली विद्युत वाहिनी हलवण्याची कार्यवाही सरकारने केली नाही, यावर युरी आलेमाव यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सरकारने आजपर्यंत सासष्टी तालुक्यातील तीन, केपे येथील तीन आणि डिचोलीतील विशेष मुलांसाठी असलेल्या शाळांचे स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट केलेले नाही. यावरून दिव्यांग व्यक्ती व विशेष मूलांबद्दल सरकारची उदासीनता दिसून येते, असे युरी आलेमाव यांनी पूढे म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व शाळांची दुरुस्ती आणि नूतनीकरण वेळेत करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा आणि उर्वरित 663 शाळांचे स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिटही तातडीने हाता घ्यावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT