Yuri Alemao MNREGA  Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: 'मनरेगा'तील 8 हजार कामगार मजुरीच्या प्रतीक्षेत; भाजप सरकारकडून एससी, एसटी, ओबीसींचा छळ

युरी आलेमाव यांची टीका; इव्हेंटवर उधळपट्टी थांबवून वेळेवर मजुरी द्या!

दैनिक गोमंतक

Yuri Alemao: एससी, एसटी आणि ओबीसी कामगारांसह मनरेगाअंतर्गत दररोज 322 रुपये कमावणारे जवळपास 8 हजार कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या हक्काच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

मी ऑक्टोबरमध्ये हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. दुर्दैवाने आजपर्यंत सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

इव्हेंटवर उधळपट्टी थांबवा आणि गरीब व कष्टकरी कामगारांची वेळेवर मजुरी द्या, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित मजुरी देण्यासाठी संबंधितांना आदेश देणे गरजेचे आहे.

दैनंदिन कमाईवर त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या कष्टकरी कामगारांची मजुरी प्रलंबित ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, असे आलेमाव यांनी नमूद केले.

कष्टकरी कामगार वेठीस

कष्टकरी कामगारांना वेळेत मजुरी न देणे हा अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि ओबीसींना छळण्याच्या भाजप सरकारच्या धोरणाचा भाग आहे. गोव्यात 51 हजार नोंदणीकृत मनरेगा कामगार असून त्यापैकी 39 हजार कार्डधारक आहेत.

राज्यात सुमारे 8 हजार सक्रिय कार्डधारक कामगार आहेत. जवळपास 42.45 टक्के कामगार हे अनुसूचित जमातीचे आहेत, तर 2.48 टक्के अनुसूचित जातीचे आहेत, असा दावा आलेमाव यांनी केला.

भाजप सरकार अर्थ खात्याची पूर्वमान्यता न घेता इव्हेंट व कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करते; पण गरीब कामगारांना मजुरी देण्यात खळखळ करते. रोजी-रोटीसाठी घाम आणि रक्त आटवणाऱ्या कष्टकरी गरीब कामगारांची मजुरी वेळेत न दिल्याबद्दल मी भाजप सरकारचा निषेध करतो.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोनवर बोलत गाडी चालवली, ट्राफिक पोलिसाला धडकला!! जुन्या गोव्यात कदंब बसमुळे 'ट्रॅफिक जॅम; Video Viral

Virat Kohli Six: वनडेत पहिल्यांदाच 'षटकार' मारुन उघडलं खातं, किंग कोहलीचा तूफानी पूल शॉट पाहून चाहतेही अचंबित; पाहा VIDEO

सुट्टी ठरली अखेरची! हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून 41 वर्षीय पंजाबी पर्यटकाचा गोव्यात मृत्यू

Goa Live News: गोव्यात निवासस्थाने वाढल्याने पर्यटक कमी दिसत आहेत; मायकल लोबो

World Cup 2027: 'विराट-रोहितने वर्ल्ड कप खेळू नये', KKR च्या माजी खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ; चाहत्यांना धक्का!

SCROLL FOR NEXT