Yuri Alemao On Sanjivini Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivini Sugar Factory: भाऊसाहेबांचा वारसा नष्ट होऊ देणार नाही; आलेमाव यांचा सरकारला इशारा

गोमंतक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आलेमाव यांची घेतली भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivini Sugar Factory: संजीवनी साखर कारखाना हा गोव्यातील शेतीला प्रोत्साहन देणारा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांचा दूरदर्शी प्रकल्प होता. आम्ही भाजप सरकारला भाऊसाहेबांचा वारसा नष्ट करून सदर कारखान्याची जमीन रिअल इस्टेट माफियांच्या ताब्यात देऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यम दिला.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचे प्रश्न आगामी विधानसभेच्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन यावेळी आलेमाव यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी इथेनॉल तयार करणारा कारखाना सुरू करण्याच्या त्यांच्या मागणीचा विचार करावा आणि त्यांची प्रलंबित नुकसानभरपाई त्वरित द्यावी, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

आज गोमंतक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे निवेदन आलेमाव यांनी दिले. धारबांदोडा येथे इथेनॉल प्लांट उभारण्याची त्यांची एक मागणी आहे. ऊस हाच इथेनॉल उत्पादनांत मुख्य घटकांपैकी एक असल्याने सदर कारखान्याच्या स्थापनेने ऊस उत्पादकांना मदत होणार आहे असे मत त्यांनी मांडले. त्यांच्या मागणीशी मी पूर्णपणे सहमत सून सरकारसमोर त्यांच्या मागण्यांचे व इतर समस्यांचे सर्वोच्च प्राधान्याने निराकरण करण्याची मागणी करणार आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

भाजप सरकार एकूण 15 लाख चौरस मीटर जमिनीपैकी जवळपास 7 लाख चौरस मीटर जमन रिअल इस्टेट लॉबीला देण्याचा प्रयत्न करत आहे. या जमिनीवर भाजपचे काही मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा डोळा आहे. ही जमीन शेतकऱ्यांच्या हितासाठीच वापरली जावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या स्वतःच्या आश्वासनावर भाजप सरकारने आता पाठ फिरवली आहे, हे धक्कादायक आहे. एकप्रकारे सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची शेती थांबवण्यासाठी परावृत्त करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'चायनामन'ची जादुई गोलंदाजी! UAE विरुद्ध एकाच षटकात घेतल्या 3 विकेट्स, पण हॅटट्रिक हुकली VIDEO

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

SCROLL FOR NEXT