Yuri Alemao | Goa News Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : पोप फ्रांसिस यांच्या गोवा भेटीच्या समावेशासाठी प्रयत्न करा; आलेमाव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोप फ्रांसिस यांनी 2024 मध्ये भारतात येण्याचे जाहीर केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao : पोप फ्रांसिस यांनी 2024 मध्ये भारतात येण्याचे जाहीर केले आहे. पोप यांच्या भारत दौऱ्यात गोवा भेटीचा समावेश व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

आपण सर्वांनी पोपचे भव्य स्वागत करुया. गोवा आणि गोमंतकीयांना पोप यांचा आशीर्वाद लाभू दे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

पोप फ्रांसिस यांनी 2024 मध्ये भारत भेट देण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पोपइनगोवा हा हॅशटॅग देखील आपल्या समाजमाध्यमांवर सुरू केला आहे.

पोप जॉन पॉल- 2 यांची फेब्रुवारी 1986 मध्ये गोव्याला झालेली भेट राज्यातील अनेक कॅथलिक भाविकांच्या आणि इतर गोमंतकीयांच्या स्मृतीत आहे. परमपूज्य पोप जॉन पॉल-२ यांनी पणजीतील कांपाल मैदानावर सार्वजनिक प्रार्थना सभेला संबोधन केले होते.

गोवा भेटीदरम्यान त्यांनी बिशप हाऊसमध्येही मुक्काम केला होता, अशी आठवण युरी आलेमाव यांनी करून दिली.

माझा जन्म 1984 मध्ये झाला आणि पोप जॉन पॉल यांचा गोमंतकीयांना कोकणी भाषेत अभिवादन करतानाचा संग्रहित चित्रफीत पाहणेच मला शक्य झाले. पोप फ्रांसिस यांची पुढील वर्षी गोवा भेट झाल्यास माझ्यासारख्या नवीन पिढीतील तरुणांना त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळेल, असे युरी आलेमाव म्हणाले.

मी पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका आणि आमदार तसेच लोकप्रतिनिधींना तसेच कलाकार, खेळाडू, शिक्षणतज्ज्ञ, पर्यटन व्यावसायीक, सामाजिक कार्यकर्ते आणि गोमंतकीयांना आवाहन करतो की त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत भेटीच्या घोषणेचे स्वागत करावे आणि त्यांच्या गोवा भेटीसाठी प्रार्थना करावी, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

या ऐतिहासिक दौऱ्याची तयारी आतापासूनच सुरू करावी, असे आवाहनही मी गोवा सरकारला करतो. आजपासून कामाला सुरुवात होवू द्या अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT