Milind Naik Sex Scandal : मिलिंद नाईक कथित बलात्कारप्रकरणाला नवे वळण! उच्च न्यायालयाने क्राईम ब्रँचला फटकारले

भाजपचे माजी आमदार मिलिंद नाईक यांच्या यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाला आता एक नवे वळण प्राप्त झाले आहे.
Milind Naik Sex Scandal
Milind Naik Sex Scandal Dainik Gomantak
Published on
Updated on

Milind Naik Sex Scandal : भाजपचे माजी आमदार मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाला आता एक नवे वळण प्राप्त झाले आहे.

मिलिंद नाईक यांच्या विरोधात संकल्प आमोणकर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर न नोंदवल्याबद्दल न्यायालयाने क्राईम ब्रँचवर ताशेरे ओढले आहेत. अद्याप आमोणकरांच्या तक्रारीवर क्राईम ब्रँचने एफआयआर का नोंदवली नाही, याबाबत ब्रँचला सवाल करण्यात आला.

Milind Naik Sex Scandal
Solutions For Waste: कचऱ्यासाठी पंचायतींनी उपाययोजना करावी

क्राईम ब्रँच संकल्प आमोणकरांच्या तक्रारीवर काय करणार आहे, ते सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. क्राईम ब्रँचने उच्च न्यायालयासमोर याप्रकरणी अंतिम अहवाल सादर करणार असल्याचे सांगून 4 आठवड्यांचा कालावधी मागून घेतला आहे.

उच्च न्यायालयाने गुन्हा शाखेला या कथित बलात्कार प्रकरणातील आतापर्यंत तपास केलेल्या सर्व गोष्टी, पुरावे अंतिम अहवालात सादर करण्याचे निर्देश दिले असून याप्रकरणी पुढील सुनावणी 13 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

या सगळ्यामुळे कुठेतरी थांबलेले हे प्रकरण पुन्हा एकदा जोर घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com