Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची नियुक्ती

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के सी वेणूगोपाल यांच्याकडून पत्रक जारी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : गोवा काँग्रेसमधील बंडानंतर आता काँग्रेस नेतृत्वाने स्थानिक पक्षसंघटनात बदल करण्यास सुरुवात केली आहे. गोवा विधानसभेतील काँग्रेस विधीमंडळ नेतेपदी आमदार युरी आलेमाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के सी वेणूगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. मात्र युरी आलेमाव या निर्णयावर खुश नसल्याची सुत्रांची माहिती आहे.

काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ठरणार असल्याचं गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. त्यासाठी गोव्यात 11 किंवा 12 रोजी पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक गोव्यात येणार असल्याचंही बोललं जात होतं. सर्व आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर ते त्या नेत्याचे नाव जाहीर करतील, असं पाटकरांनी जाहीर केलं होतं. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीनंतर सर्व समीकरणं बदलली आणि वासनिक यांचा गोवा दौरा काही होऊ शकलेला नाही. मात्र यातच उरलेल्या तीन आमदारांपैकी युरी आलेमाव यांच्या गळ्यात पक्ष नेतृत्त्वाने गटनेतेपदाची माळ घातली आहे.

आठ आमदार भाजपमध्ये गेल्‍यानंतर काँग्रेसचे तीनच आमदार शिल्लक राहिलेत. यामुळे विधिमंडळ गटनेतेपदासाठी हळदोणेचे आमदार ॲड.कार्लुस फेरेरा आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्यापैकी एकाची निवड होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार का?, असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे.

यासंदर्भात ॲड.कार्लुस फेरेरा यांनी सांगितले, राज्य विधानसभेच्या नियमानुसार सभागृहात सत्ताधारीच्या पक्षानंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला प्रमुख विरोधी पक्ष मानला जातो. त्याच पक्षातील विधिमंडळ गटनेत्याला सभापतींनी मंजुरी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते पद दिले जाते. दरम्यान, आमदार फुटले असले तरी अजूनही काँग्रेसचा विधिमंडळ गटनेता निश्‍चित झालेला नव्हता. मायकल लोबो यांची हकालपट्टी करून दोन महिने उलटले तरी पक्षाचे विधिमंडळ गटनेतेपद रिक्तच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT