YouTuber Elvish Yadav Crime Case Dainik Gomantak
गोवा

Elvish Yadav: एल्विशने गोवा, पंजाबमध्येही पुरवले सापाचे विष? सखोल तपास होणार

YouTuber Elvish Yadav Crime Case:एल्विश यादव याच्याविरोधात रेव्ह पार्टीसाठी सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप आहे.

Pramod Yadav

YouTuber Elvish Yadav Crime Case

YouTuber एल्विश यादव याच्याविरोधात रेव्ह पार्टीसाठी सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप आहे. नोएडा पोलिसांनी गेल्या रविवारी एल्विशला याप्रकरणी अटक केलीय.

एल्विश यादवने केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर गोवा आणि पंजाबमध्ये देखील रेव्ह पार्टी आयोजकांना सापाचे विष पुरवल्याचा आरोप होत असून, याप्रकरणी आता सखोल तपास केला जात आहे.

एल्विश यादव विरोधात IPC कलम 120A (गुन्हेगारी कट) आणि वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या तरतुदींनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता.

एल्विशच्या विरोधात मजबूत पुरावे असल्याचा दावा करत, पोलिसांनी अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 चे कलम 284 (विषारी पदार्थाच्या संदर्भात निष्काळजी वर्तन) आणि 289 (प्राण्यांच्या संदर्भात निष्काळजी वर्तन) एफआयआरमध्ये नव्याने जोडले आहेत.

दिल्ली-एनसीआरमधील सहा हाय-प्रोफाइल पार्टीसाठी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी एल्विशचा सहभाग आढळून आला आहे. जयपूरच्या राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडून (FSL) फेब्रुवारीमध्ये मिळालेले फॉरेन्सिक पुरावे त्याच्या अटकेत सर्वात महत्त्वपूर्ण पुरावे ठरले, अशी माहिती एल्विशच्या तपासात सहभागी असलेल्या सूत्राने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

पुढील तपास आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस एल्विशच्या कोठडीसाठी अर्ज करणार आहेत. तसेच, याप्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

पोलिसांनी राहुल (३२), तीतुनाथ (४५), जयकरण (५०), नारायण (५०) आणि रविनाथ (४५) (सर्व रा. दक्षिण-पूर्व दिल्लीतील बदरपूर) या पाच अन्य आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या ते सर्व जामिनावर बाहेर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT