Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: गोव्याच्या तरूणाईचे 'दम मारो दम'

काही दिवसांपूर्वी अंमलीपदार्थप्रकरणी गोव्यात आलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: अंमलीपदार्थाचा पुरवठा करण्यासाठी गोव्यात आलेल्या झारखंडच्या युवतीला अटक करण्यात आली. मुस्कान रोहित करूआ (19) असे तिचे नाव आहे. अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने करमळी रेल्वे स्थानकावर आज ही कारवाई केली. तिच्याकडून 6 लाख रुपयांचा सुमारे 6 किलो गांजा जप्त करण्यात आला.

(Goa Crime Case)

काही दिवसांपूर्वी अंमलीपदार्थप्रकरणी गोव्यात आलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याने दिलेल्या माहितीनुसार इतरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अंमलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या व्यक्तीशी बोगस ग्राहकाच्या आधारे संपर्क साधण्यात आला. त्याने एका तरुणीला रेल्वेने गांजा घेऊन पाठवतो, असे सांगून त्या तरुणीच्या वर्णनाची माहिती दिली होती. ती मांडवी एक्स्प्रेसने येणार असून करमळी रेल्वे स्थानकावर उतरेल, अशी माहिती दिली होती.

या माहितीवरून अंमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलिस काल संध्याकाळी करमळी रेल्वे स्थानकात उपस्थित होते. पोलिसांचा बोगस ग्राहकही तेथे तैनात करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे आली व ती तरुणी रेल्वे स्थानकावर उतरली.

बोगस ग्राहकाने पोलिसांना दूरवरून तरुणी दाखवली. पोलिस पथकाने तिच्या बॅगची झडती घेतली असता आतमध्ये गांजा सापडला. तिला ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.

तिच्याविरुद्ध अंमलीपदार्थविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ड्रग्ज व्यवहाराशी संबंधित असलेल्या तिच्या इतर साथीदारांचाही शोध पोलिस घेत आहेत. संशयित मुस्कान ही मूळची झारखंड येथील असून ती गेली काही वर्षे मुंबईत राहत असून डान्स बारमध्ये नृत्य करण्याचे काम करते. झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाने ती या ड्रग्ज साठा पोहचवण्याचे कामात गुंतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT