Arrest
ArrestDainik Gomantak

Ponda Crime News: केरळीयनांकडून रूग्णालयाच्या सुरक्षारक्षकांना मारहाण

फोंड्यातील प्रकार; अदखलपात्र गुन्हा दाखल
Published on

फोंडा: फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात प्रवेश बंदी भागातून वाहन नेल्याप्रकरणी बाचाबाची झाल्याने तिघा केरळीयनांनी इस्पितळाच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याची तक्रार फोंडा पोलिसांत आल्यानंतर पोलिसांनी या तिघाही केरळीयनांना ताब्यात घेतले. हा प्रकार काल (बुधवारी) रात्री घडला; पण प्रकरण शेवटी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आल्याने त्या तिन्ही केरळीयनांना दिलासा मिळाला.

(Hospital security guards beaten up by 3 Kerala Persons in ponda )

Arrest
Noise Pollution in Goa : गोव्यात ध्‍वनिप्रदूषण आता रोखावेच लागणार! अन्यथा पोलीस राहतील जबाबदार

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळातील या वादावेळी बाचाबाची आणि मारहाण झाल्यामुळे रेव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेऊन यात गुंतलेल्या केरळीयनांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मूळ केरळ येथील; पण सध्या फोंड्यात राहणाऱ्या वैशाख एम. के. याच्यासह अन्य दोन केरळीयन तरुणांना ताब्यात घेतले.

फोंडा पोलिसांनी हे प्रकरण अदखलपात्र म्हणून नोंद केली असून ते दोन्ही बाजूंनी मिटल्यात जमा आहे. दरम्यान, आरजीचे कार्यकर्ते विश्‍वेश नाईक, प्रेमानंद गावडे व शैलेश नाईक यांनी असे प्रकार पुन्हा होता कामा नये, असे सांगून गोमंतकीयांना सध्या कोणत्याच बाबतीत सुरक्षितता राहिली नसल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com