Goa Panchayat Election: पंचायत निवडणुकीमध्ये दोन उमेदवार 'बिनविरोध'

15 प्रभागांसाठी 40 उमेदवार रिंगणात
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्य निवडणूक आयोगाने उत्तर गोव्यातील जाहीर केलेल्या हळर्ण, कासारवेर्णे आणि चांदेल-हसापूर या तीन पंचायतींच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन प्रभागांमध्ये इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

(Two candidates unopposed in panchayat elections in North Goa)

Goa Panchayat Election
Crime News: फातोर्डा येथे लॅपटॉप चोरी प्रकरणी दोघांना अटक

यात हळर्ण पंचायत प्रभाग 1 मधून विनोद हरिजन आणि चांदेल-हसापूर प्रभाग 1 मधून प्रजय मलिक बिनविरोध विजयी झाले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांनी दिली आहे.

गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हळर्ण, कासारवेर्णे आणि चांदेल-हसापूरया तीन पंचायतींच्या १७ प्रभागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी दोन प्रभागांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले असून आता १५ प्रभागांकरता ४० उमेदवार रिंगणात आहेत. यात हळर्ण पंचायतीमध्ये ६ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत तर कासारवेर्णे पंचायतीमध्ये ४ प्रभागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय चांदेल-हसापूर पंचायतीमध्ये ४ प्रभागांकरता ११ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Elections 2027
Goa Amar Bandekar Case
Goa Panchayat Construction
Goa Politics
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com