Youth killed in Giri-Mapusa accident One injured Dainik Gomantak
गोवा

गिरी-म्‍हापसा अपघातात युवक ठार; एक जखमी

गिरीत अपघातात एकाच मृत्यू

दैनिक गोमन्तक



म्हापसा : गिरी येथील उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी रात्री उशिरा पावणेबाराच्‍या
सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रमेश मडगावकर (पालये-उसकई) या 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर, सिद्धेश कळंगुटकर (रा. कळंगुट) हा जखमी झाला आहे. सिद्धेश हा दुचाकी चालवत होता, तर मयत प्रमेश त्याच्या मागे बसला होता.

यासंदर्भात माहिती देताना म्हापसा (mapusa) पोलिसांनी सांगितले की, दुचाकीस्‍वार पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने येत असताना उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीची धडक एका कारगाडीला बसली. त्यानंतर दुभाजकाला व दुसऱ्या एका जीपला त्या वाहनाने धडक दिली. या अपघातात प्रमेशचे डोके दुभाजकावर आदळून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस (police) उपनिरीक्षक आशिष पोरोब व हवालदार तुळशीदास नारोजी यांनी अपघाताचा (Accident) पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, करमणे येथे एक व्यक्ती मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या कनर्ल सिंग असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

करमणे येथे मृत व्यक्ती सापडल्याची पोलिसांना (Police) माहिती मिळताच तातडीने पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. मृत व्यक्तीला दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणीनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले आहे. मालीम-बेती जेटीवर शुक्रवारी रात्री मारहाण करून नदीत फेकून दिलेल्‍या शिब्रण राम (20, मूळ छत्तीसगड) या मच्छीमारी बोटीवर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह रविवारी सकाळी मांडवी (Mandovi) नदीत तरंगताना सापडला होता. आता आणखी एक मृतदेह सापडल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

SCROLL FOR NEXT