youth from Thane was arrested by Fatorda Police  Dainik Gomantak
गोवा

Margao Drugs Case: अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ठाण्यातील युवकाला अटक; 40 हजार रुपयांचे एलएसडी पेपर्स जप्त

मडगाव येथील होलसेल मासळी मार्केट परिसरात कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Drugs Case: फातोर्डा पोलीसांनी मडगाव येथील होलसेल मासळी मार्केट परीसरात कारवाई करून एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी ठाण्यातील युवकाला रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

ओंकार चंदरकर (23) असे संशयित आरोपीचे नाव असून तो ठाणे महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. सध्या फातोर्डा येथील माडेल या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होता. या विषयीची माहिती प्राप्त होताच आज सकाळी त्याच्यावर पाळत ठेऊन रंगेहाथ त्याला पकडण्यात आले.

त्याची पोलिसांनी झडती घेतील असता 40 हजार रुपये किमतीचे एलएसडी पेपर्स सापडले. या युवकाला अटक केल्यानंतर त्या विषयीची माहिती संशयिताच्या नातेवाईकांना दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणी उपनिरिक्षक योगेश गावकर तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी गोवा पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नाशिकच्या एका संशयिताला अटक केली होती. पंकज सुरेश असे त्याचे नाव असून कारवाईवेळी संशयिताकडून 1.80 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये एमडीएमए (8 ग्रॅम) आणि 10 ग्रॅम चरस यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Traffic Police: 'बेशिस्त' वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका! वर्षभरात 94 लाखांहून अधिक दंड वसूल; 5,025 जणांवर कारवाई

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT