AI Robot On Goa Beach : आता रोबोट जीव वाचवणार; गोव्यात दृष्टिच्या मदतीला AI तंत्रज्ञान

Aurus आणि Triton स्वयंचलित-ड्रायव्हिंग रोबोट वापरण्यास दृष्टिची सुरवात
AI robot on Goa beach
AI robot on Goa beachDainik Gomantak
Published on
Updated on

AI Robot On Goa Beach : गोवा सरकारने नियुक्त केलेल्या दृष्टि मरिन्स या जीवरक्षक संस्थेने एक नवीन उपक्रम राबविला आहे. दृष्टि मरिन्सने आता एआय (AI) प्रणालीवर काम करणारे Aurus आणि Triton स्वयंचलित-ड्रायव्हिंग रोबोट वापरण्यास सुरवात केली आहे.

या वर्षी Tritonचे100 युनिट्स आणि AURUSचे 10 युनिट्स गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्याचा दृष्टीचा मानस आहे. या रोबोटच्या मदतीने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तसेच इतर पाण्याच्या ठिकाणी दृष्टि मरिन्सना माणसांना रेस्कु करण्यात मदत होणार आहे.

सध्या Aurus उत्तर गोव्यातील मिरामार समुद्रकिनारी मदतीसाठी तैनात आहे तर Triton दक्षिण गोव्यातील बायणा, वेळसाव, बाणावली, गाल्जीबाग आणि उत्तर गोव्यातील मोरजी येथे तैनात आहे.

AI robot on Goa beach
Goa Mining : कोट्यवधी रुपयांचा खनिज निधी वापराविना; निधी वापराच्या परवानगीसाठी सरकारचा न्यायालयात अर्ज

AURUS आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षकांसोबत काम करेल. AURUS रोबोट एक सेल्फ-ड्रायव्हिंग मिनी-वॅगन असून त्यावर लाऊड स्पीकर बसविण्यात आला आहे. हा रोबोट किनाऱ्यावरील भागामध्ये गस्त घालण्यासाठी तसेच समुद्राच्या भरतीच्या वेळी पर्यटकांना सतर्क करून जीवरक्षकांना मदत करण्यासाठी विकसित केला आहे.

AURUSने समुद्रकिनाऱ्यावर 110 तासांचे गस्तिचे काम पूर्ण केले असून गस्तीचे काम करताना सुमारे 130 किलोमीटरचा भाग त्याने पूर्ण केला आहे. त्याच्या एआय बॉटमध्ये 100 किलो पेलोड आहे आणि त्यामुळे त्याचा लॉजिस्टिक सपोर्ट व्हेइकल म्हणूनही वापर केला जाऊ शकतो.

AI robot on Goa beach
Panaji Crime News: पतीला कारमध्ये डांबून मारहाण; व्हिडीओ कॉलद्वारे पत्नीकडे मागीतली खंडणी

AURUS आणि TRITON च्या AI सिस्टीमचा प्राथमिक उद्देश हा नॉन-स्विम झोनचे निरीक्षण करणे, त्याद्वारे पर्यटकांना धोक्याची सूचना देणे आणि जवळच्या जीवरक्षकाला सूचित करणे हा आहे. समुद्रकिनाऱ्यांचे सर्वसमावेशक कव्हरेज देण्यासाठी AURUS काम करेल तर TRITON नॉन-स्विम झोनमध्ये गस्त घालेल.

TRITON ने आतापर्यंत 19,000 तासांचा रनटाइम पूर्ण केला आहे. AURUS आणि TRITON मध्यवर्ती नियंत्रण कक्षात असलेल्या 'टेक लाईफसेव्हर्स' द्वारे ऑपरेट केले जातात तसेच ते रोबोट कोणत्या भागात गस्त घालतील ते त्या टिम्स ठरवतात.

AI robot on Goa beach
CRZ नियमांचे उल्लंघन करण्यात गोवा देशात अव्वल, पाच वर्षांत 974 प्रकरणे आली उजेडात

"AURUS आणि TRITON मुळे मोठ्या प्रमाणात मदत होईल. या रोबोटमध्ये जीव वाचवण्याची क्षमता आहे. विशेषत: सीझनमध्ये जीवरक्षकांना पर्यटकांनी भरलेलेल्या समुद्रकिनाऱ्याच्या लांबच्या भागांवर नजर ठेवणे आणि गस्त घालणे आवश्यक असते."

"या दोन AI-आधारित प्रणालींनी काम करण्याची क्षमता वाढवली आहे. आम्‍हाला आशा आहे की प्रणाली सुधारत असताना ते प्रत्येक समुद्रकिना-यांचा एक अत्यावश्यक भाग बनतील त्यामुळे आमचे समुद्रकिनारे जगातील सर्वोत्तम संरक्षित समुद्रकिनारे बनतील.” असे नवीन अवस्थी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com