Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: फोटोग्राफर निघाला ड्रग्ज विक्रेता! तामिळनाडूच्या तरुणाच्या आवळल्या मुसक्या, एक लाखाचा गांजा जप्त

Goa Crime News: गोव्यात फोटोग्राफर म्हणून आलेला एकजण चक्क गांजा विक्रेता निघाला. मडगाव पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत मूळ तामिळनाडूतील एकाला गांजासह पकडले.

Sameer Panditrao

Photographer arrested for selling cannabis in Goa

मडगाव: गोव्यात फोटोग्राफर म्हणून आलेला एकजण चक्क गांजा विक्रेता निघाला. मडगाव पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत मूळ तामिळनाडू राज्यातील एकाला गांजासह पकडले असता ही धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड झाली.

अटक केलेल्या संशयिताचे नाव अरुण प्रसाथ गणेशन (३०) असे असून तो मूळ तामिळनाडू राज्यातील आहे. मालभाट येथे ओल्ड रेल्वे स्टेशन रोडजवळ मध्यरात्री पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १०९६ ग्रॅम गांजा सापडला. त्याची किंमत १ लाख ९ हजार ६०० रुपये इतकी आहे. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी नंतर त्याला रितसर अटक केली.

तामिळनाडूतून त्याने हा गांजा आणला होता, असे प्राथमिक पोलिस तपासात आढळून आले आहे. गोव्यातील किनारपट्टीवर तो फोटोग्राफर म्हणून उपजीविका करीत असल्याचे भासवीत असला तरी पर्यटकाना हेरून त्यांना गांजा विकण्याचा त्याचा प्रमुख धंदा बनला होता.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक व हवालदार गोरखनाथ गावस यांनी या संशयिताला अटक केली. अमलीपदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT