Usgaon Tisk Crime Dainik Gomantak
गोवा

घनदाट जंगलात आढळला तरुणीचा मृतदेह, उसगाव-तिस्क घटनेने अनेक प्रश्न निर्माण; पोलीस तपास सुरू

Woman Dead Body Forest Goa: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला २४ ते ३० वयोगटातील असण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

फोंडा: गोव्यातील प्रतापनगर, उसगाव-तिस्क परिसरात सोमवारी (दि.१६) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दाट जंगलात आढळून आलेल्या या मृतदेहामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही महिला नेमकी कोण, तिची ओळख अद्याप पटलेली नाही, तसेच तिच्या मृत्यूचे कारणही अस्पष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला २४ ते ३० वयोगटातील असण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा पोलिसांना सकाळी एका महिलेचा मृतदेह जंगलात सापडल्याचा फोन आला.

माहिती मिळताच, कोणतीही वेळ न दवडता पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस इन्स्पेक्टर विजयनाथ कवळेकर आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला. मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, ते ठिकाण घनदाट जंगल असल्याने, हा मृतदेह इथे कोणी आणून टाकला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृतदेहाची ओळख पटवणे आणि मृत्यूचे कारण शोधणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. तपासात मदत व्हावी यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे, ज्यामुळे तपासाला दिशा मिळू शकेल.

हा खून आहे की आणखी काही, याबाबत सध्या तरी काहीही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी स्थानिक लोकांकडून माहिती मिळवण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

SCROLL FOR NEXT