Young man kills senior citizen in Calangute  Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये तरुणाने केला ज्येष्ठ नागरिकाचा खून

जोजफ फर्नांडिस याला गडेकर यांनी मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: सावतावाडा-कळंगुट येथील जोजफ फर्नांडिस या ज्येष्ठ नागरिकाचे डोके सिमेंट काँक्रिट बांधकामावर तीन -चारवेळा आदळून त्याच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून नितीन गडेकर (38) या संशयित तरुणास कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना पूर्ववैमनस्‍यातून घडल्‍याचे पोलिसांनी सांगितले. नितीन दीना गडेकर (38) व एलिझाबेथ फर्नांडिस त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी तेथे आलेल्या जोजफ फर्नांडिस याला गडेकर यांनी मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सावतावाडा-कळंगुट येथील जोजफ फर्नांडिस (57) या वृद्धाचे डोके सिमेंट काँक्रिट बांधकामावर तीन-चारवेळा आदळल्याचे पोलिसांनी सांगितले. सावतावाडा - कळंगुट येथील नितीन दीना गडेकर (38) हा संशयित रविवारी दुपारी पावणेदोन वाजण्‍याच्या सुमारास आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नी असलेल्या एलिझाबेथ फर्नांडिस यांना त्या या भागात चालवत असलेल्या रेस्टॉरंटमध्‍ये भेटण्‍यास आला होता. यावेळी त्यांच्यात असलेल्या पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि गडेकर यांनी एलिझाबेथ यांना त्यांच्या केसांना धरून जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. एलिझाबेथचे किंचाळणे ऐकून तेथे धाव घेतलेल्या जोजफ फर्नांडिस यांच्यावर नितीनने जोरदार हल्ला चढवित त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्याला खाली पाडून तेथील सिमेंट कॉक्रिटच्या बांधकामावर सलग तीन-चार वेळा जोजफचे डोके आदळवून त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्‍वरित जखमी जोजफला उपचारासाठी बांबोळीच्या ‘गोमेकॉ’त पाठविले. परंतु, या मारहाणीत डोक्याला जबर मार बसलेल्या जोजफची वाटेत रस्त्यातच प्राणज्योत मालवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz Panchayat Fertiliser Scam: सांताक्रूझ खत घोटाळा प्रकरणी सरपंच, माजी सचिवांवर एफआयआरचे आदेश; पोलिसांना न्यायालयाचे निर्देश

Drug Case: 11 कोटींच्या ड्रग्सप्रकरणात संशयिताला जामीन; 24 तासांनंतर कोर्टात हजर केल्याने पोलिसांना दणका

ST reservation: 'भाजप सरकारला एसटींना आरक्षण द्यायचेच नाही'; विजय सरदेसाई यांचा आरोप

Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

India First Flex Hybrid Car: भारतातील पहिली फ्लेक्स-हायब्रिड कार लॉन्च! E20 ते E85 इंधनावर धावणार टोयोटाची नवी Innova HyCross, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT