Harvalem Waterfalls: Goa
Harvalem Waterfalls: Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: हरवळे धबधब्यात युवक बुडाला

दैनिक गोमन्तक

डिचोली: गोव्यातील (Goa) जागतिक पर्यटन (Tourism) स्थळ असलेल्या हरवळे धबधब्यावर (Harvalem Waterfalls) पर्यटनाची (Tourist) मजा लुटण्यासाठी आलेला एक 22 वर्षीय युवक काल रविवारी सायंकाळी बुडण्याची घटना घडली आहे. धबधब्यात बुडालेला युवक हा मूळ अमृतसर-पंजाब येथील असून, त्याचे नाव नवज्योत सिंग असे आहे. सध्या तो होंडा येथे राहत होता. पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीतील एका उद्योग प्रकल्पात मयत युवक कामाला होता. अशी माहिती मिळाली आहे. (young man drowned in lost Harvalem Waterfalls in Goa)

मिळालेल्या माहितीनुसार तीन मित्रांचा एक गट रविवारी सायंकाळी हरवळे धबधब्यावर आंघोळीसाठी गेला होता. मागील दहा-बारा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सध्या हरवळे धबधब्याच्या पायथ्याखाली पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. प्रवाहही वाढला आहे. अशा परिस्थितीत पाण्यात उतरणे धोकादायक असतानाही, धोका पत्करून तिन्ही युवक आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. आंघोळीच्या नादात दोन युवक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यांच्या मदतीसाठी नवज्योत गेला असता, तो पाण्यात बुडाला.

मृतदेहाचा पत्ता नाही

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देताच, दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी गळ टाकून बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम चालू होती. मात्र मृतदेह आढळून आला नव्हता. काळोख पडताच शोध मोहीम थांबविण्यात आली. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. गावस यांनी दिली.

पर्यटन मोसमातील पहिला बळी

मयत नवज्योत सिंग हा हरवळे धबधब्यावरील यंदाच्या पावसाळी पर्यटन मोसमातील पहिला बळी ठरला आहे. तर मागील पावणेचार महिन्यातील तिसरा बळी ठरला आहे. मागील एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला गोलू कुमार आणि सत्यम कुमार हे मूळ बिहार येथील दोन युवक बुडून मृत्युमुखी पडले होते. आज आणखी एका युवकाचा बळी गेल्याने पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरवळे धबधब्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT