Yog Setu And Parshuram Statue in Panaji Goa  Dainik Gomantak
गोवा

'भोग नव्हे, योग भूमी', मांडवी किनारी उभारलेल्या योग सेतू आणि भगवान परशुरामाच्या पुतळ्याचे लोकार्पण

योग सेतू गोव्याची भोग नव्हे तर योग भूमी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरले - मुख्यमंत्री

Pramod Yadav

Yog Setu And Parshuram Statue: मांडवी नदीच्या किनारी योग सेतू आणि भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. भगवान महावीर बाल विहार कांपाल याला लागूनच हा योग पथ विकसित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज (दि.21) योग सेतू आणि पुरशुरामाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे पणजीत आणखी एक पर्यटनस्थळाची भर पडली आहे. 'योग सेतू गोव्याची भोग नव्हे तर योग भूमी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरले.' असे मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

Yog Setu And Parshuram Statue in Panaji Goa

पणजी जिमखाना येथून पुढे गोवा मनोरंजन सोसायटी जवळ येणाऱ्या मार्ग विकसित करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. ईसीजी जवळ जोडणारा ब्रिट योग सेतू म्हणून ओळखला जाणार आहे. येथे योगला प्रोत्साहन देण्यासह योगबाबत माहिती देणाऱ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.

तपोलोक, योगक्षेत्र असे याला नाव देण्यात आले आहे. ईसीजीकडून प्रवेशद्वाराला सिंह द्वार असे नाव देण्यात आले आहे. या सेतूमध्ये मांडवी च्या दोन विरूद्ध दिशेला योग करतानाचा पुतळे उभारण्यात आले आहेत, त्याला योग पुरूष आणि पूर्ण योगी अशी नावे देण्यात आली आहेत.

Yog Setu And Parshuram Statue in Panaji Goa

त्यापुढे योग दालन, योग मंडल, योग पथ असे दिशादर्शक फलक लावले आहेत. प्रत्येक ठिकाणी योग करण्यासाठी जागा आणि योगासनाची माहिती देण्यात आली आहे.

योग पथावर योगसन करणारे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यापुढे प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र देखील आहे. यात देखील विविध माहिती पाहायला मिळेल. याच ठिकाणी मांडवी किनारी गोमंतभूमी जनक परशुराम यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. एका हातात धनुष्यबाण आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेतलेला भगवान परशुरामाचा पुतळा आकर्षणाचा विषय ठरत आहे. तसेच, पर्यटकांसाठी नवा स्पॉट ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT