Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: राज्यात मुसळधार सुरुच, पुढील चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

येत्या चार दिवसांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गोव्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे तसेच पणजी शहरातील गटारे तुंबली आहेत. यामुळे वाहनचालकांना वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान गोवा हवामान खात्याने राज्याला आज ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

गोवा हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. 29 जून रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

30, 1, 2, 3 जुन रोजी राज्यात यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

मागील 24 तासांत या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पणजी शहरात 209.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पाणी दुकाने, घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पाणी आल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत जावे लागले.

पणजीतील मुख्य शहरासह करंजाळे, मिरामार, सांतिनेज, भाटले, मळा, कदंब बस स्टॅण्ड या ठिकाणीही पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT