Hockey Team Dainik Gomantak
गोवा

Dayanand Bandodkar Sports Complex: झेवियर्सचा महाविद्यालयीन हॉकीत दबदबा

दोन्ही गटात विजेतेपद- पेडणे महाविद्यालयात पुरुषांत, रोझरीला महिलांत उपविजेतेपद

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Dayanand Bandodkar Sports Complex म्हापशाच्या सेंट झेवियर्सने आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत दबदबा राखताना पुरुष व महिला गटात विजेतेपद मिळविले. गोवा विद्यापीठाने घेतलेली स्पर्धा पेडे-म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलातील हॉकी टर्फवर झाली.

पुरुषांच्या अंतिम लढतीत सेंट झेवियर्सने पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयाचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला. याच गोलफरकाने महिला गटातही त्यांनी नावेलीच्या रोझरी महाविद्यालयास हरविले.

स्पर्धेतील पुरुष गटात 11, तर महिला गटात पाच महाविद्यालयीन संघांनी भाग घेतला होता. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे हॉकी प्रशिक्षक व्हिक्टर आल्बुकर्क यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

सेंट झेवियर्सचे विजयी खेळाडू

महिला- संतोषी नागेकर, तनिशा मुरगोड, अनोष्का डिसोझा, फ्लाव्हिना रॉड्रिग्ज, कृत्तिका नाईक, नमिता गोवेकर, वीणा नाईक, प्रज्वला हरमलकर, सेजल पार्सेकर, अपर्णा नाईक, प्रचिता वेर्लेकर, रिया साळगावकर, दीक्षा चौधरी, अदिती नाईक, सलोनी हळदणकर, श्रुती वायगणकर.

पुरुष- आशुतोष नार्वेकर, जी. कृष्णय्या, पवन साळगावकर, कौशिक साखळकर, यश तारकर, समीर यालिगार, दीपक गुरव, गौरव पालयेकर, अभिषेक पाठक, ओमकार चव्हाण, सारंग होणखंडे, बन्सीधर झा, आकाश पवार, शुभम शर्मा, गौरवकुमार सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayde Village: मयडेला शहर घोषित करण्यास विरोध, ग्रामसभेने प्रस्ताव फेटाळला; ग्रामीण अस्तित्व कायम ठेवण्याचा ठराव

...अन् आईने फोडला हंबरडा! अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी; तिघा मदार बंधूंवर शोकाकुल स्थितीत अंत्यविधी

आत्महत्या की घातपात? पाली येथील विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह, 2 दिवसांपासून होता बेपत्ता; वाळपई पोलिसांकडून तपास

खरी कुजबुज: सलमान, अझरुद्दीनचे विजयला मेसेज

पाण्यात उतरताना युवकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे, कुळे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT