The Jesuits, Goa and the Arts, Xavier Centre of Historical Research Dainik Gomantak
गोवा

जेज्युईटांचे स्थानिक प्रजेसोबत होते सौहार्दाचे संबंध; झेवियर इतिहास संशोधन केंद्र

दैनिक गोमन्तक

The Jesuits Goa and the Arts Book: पोर्तुगीज राजवटीत जेज्युईटांनी केवळ इतरांचे धर्मांतर केले. धर्मांतराला विरोध करणाऱ्यांना कडक शिक्षा केल्या असे चित्र समाज मनावर बिंबवण्याचा सहेतुक प्रयत्न सध्या काही घटकांकडून होत आहे.

वास्तवात जेज्युईटांचे स्थानिक प्रजेसोबत सौहार्दाचे संबंध होते. त्यांचे या भूमीच्या कला व संस्कृतीत अपूर्व असे योगदान आहे असेही चित्र आहे. ते चित्र मांडणारे पुस्तक पर्वरी येथील झेवियर इतिहास संशोधन केंद्राने प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.

‘मोडो गोवानो’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कलेचे जनक जेज्युईट होते यावर हे पुस्तक बेतलेले आहे. राज्याची संस्कृती श्रीमंत करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका यावर या पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे.

समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या माध्यमातून चालला असल्याचे दिसते.

याविषयीची माहिती ईमेल संदेशाद्वारे देताना झेवियर इतिहास संशोधन केंद्राने म्हटले आहे, की संस्थेला त्यांच्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाची रोमांचक बातमी देताना आनंद होत आहे.

‘द जेज्युईट, गोवा आणि कला’ असे या पुस्तकाचे नाव आहे. हे पुस्तक कला, इतिहास आणि विश्वासाची नवीन दालने निश्चितपणे उघडतील.

पुस्तकाच्या प्रचारासाठी ध्वनिचित्रफीत

या पुस्तकाच्या प्रसार प्रचारासाठी झेवियर इतिहास संशोधन संस्थेने नेटाने प्रयत्न चालवले आहेत. पुस्तकाची माहिती देणारी १ मिनिट ४८ सेकंदाची ध्वनिचित्रफीत त्यांनी तयार करून ती सर्वांना पोचेल अशी व्यवस्था केली आहे.

या ध्वनिचित्रफितीत जेज्युईटांच्या प्रभावाने निर्माण झालेल्या कलाकृती आणि सांस्कृतिक गोष्टी यांची माहिती देण्यात आली आहे. युरोपीय मूळ ते गोमंतकीय अस्मिता यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT