Moti Dongor Slum  Gomantak Digital Team
गोवा

Margao News : ‘मोतिडोंगर’ संबंधातील रिट याचिका शेवटच्या टप्प्यात

राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

Margao News : मोतिडोंगर-मडगाव येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी स्थानिक आके कोमुनिदादने तीव्र विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकार आता मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंबंधी झोपडपट्टीवासीयांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा विभागासमोर दाखल केलेल्या रिट याचिकेवर आता लवकरच अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे.

मोतिडोंगर-मडगाव येथील झोपडपट्टी मोडण्यासाठी दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी नोटीस जारी केल्यावर या वस्तीत राहणारे मौला बालबट्टी आणि अन्य 209 रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

22 फेब्रुवारी 2023 रोजी ही याचिका सुनावणीस आली असता सरकारी बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सरकार या वस्तीचे पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे, असे न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात तशी घोषणाही केली होती.

निर्णयाला हरकत

या निर्णयाला तीव्र हरकत घेताना, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा अजून गोव्यात लागूच झालेला नसताना सरकार ही झोपडपट्टी कशी अधिसूचित करू शकते, असा सवाल आके कोमुनिदादचे एटर्नी सेलेस्तियान नोरोन्हा यांनी उपस्थित केला असून आम्ही याच मुद्यावर या प्रस्तावाला विरोध करू, असे त्यांनी सांगितले.

250 घरे बेकायदेशीर

मोतिडोंगर येथील कोमुनिदादच्या मालकीच्या सुमारे 24 हजार चौरस मीटर जागेवर स्थलांतरितांनी अतिक्रमण करून या झोपड्या बांधल्या आहेत. या वस्तीत सुमारे 250 बेकायदेशीर घरे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT