Wreckage at Margao KTC bus stand  Dainik Gomantak
गोवा

मडगाव केटीसी बस स्टँडवर कचरा आणि भंगारचा खच

केटीसी (KTC) बस स्टॅण्डवर शनिवारी सकाळी बसस्टँड वर पडलेल्या भंगरचा आणि कचऱ्याचा खच बघून स्थानिक रहिवाशांनी गोंधळ घातला

दैनिक गोमन्तक

मडगाव (Margao): केटीसी (KTC) बस स्टॅण्डवर शनिवारी सकाळी बसस्टँड वर पडलेल्या भंगरचा आणि कचऱ्याचा खच बघून स्थानिक रहिवाशांनी गोंधळ घातला, केटीसी बस डेपोच्या मॅनेजरने स्वतःच्या मालमत्तेतील कारवाईचा बचाव करताना म्हटले आहे की, आता हा कचरा एकत्र दिसत असला तरीही नंतर ते आम्ही वेगवेगळे करून मगच त्याची विल्हेवाट लावतो, आपुऱ्य जागेमुळे कचरा एकत्र ठेवावा लागत आहे.

केटीसीच्या मालकीच्या जमिनीवर रहिवाशांनी देखील कचरा टाकत कचरा विल्हेवाट नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार केल्याने फातोर्डा पोलिसांनीही घटना स्थळी धाव घेतली.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मडगाव नगरपरिषदेसह केटीसी अधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली दरम्यान हे प्रकरण कसे हाताळायचे याबद्दल सोमवारी या भागाची संयुक्त तपासणी निश्चित केली आहे. रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक जॉनी क्रॅस्टो यांनीही आपली उपस्थिती जाणवली.

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची उपस्थिती; संतोष मिरजकर

केटीसी डेपो मॅनेजर गिरीश गावडे यांनी मात्र वेगळी विनंती केली आहे. केटीसी बस स्टॅण्डमध्ये भंगार व्यतिरिक्त ओला, सुका, प्लास्टिक यासह सर्व प्रकारचा कचरा निर्माण होतो याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. “आम्ही एक योजना तयार केली असून यामध्ये प्रथम कचरा आमच्या मालमत्तेवर टाकला जातो, जो नंतर वेगळा केला जातो. नंतर भंगारात धातू आणि इतर कचरा असला तरी, आमचे कामगार ते विल्हेवाट लावण्यापूर्वी वेगळे करतील ”, ते म्हणाले.

गावडे यांनी माहिती दिली की, त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एग्नेलो फर्नांडिस यांच्यासोबत कचरा विल्हेवाटीची प्रक्रिया करण्यासाठी बैठक घेतली. “जमीन केटीसीची आहे, परंतु आम्ही इतर लोक आमच्या मालमत्तेवर कचरा टाकताना पाहिले आहेत. आम्ही आता आमच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कुंपण म्हणून एक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT