CM Pramod Sawant declares Restrictions in Goa Dainik Gomantak
गोवा

केवळ कडक निर्बंधांच्या घोषणेने कोरोना आटोक्यात येणार?

नाईट कर्फ्यू नाहीच, केवळ नागरिकांच्या एकत्र जमण्यावर निर्बंध

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निर्बंध लावल्याचं जाहीर केलं आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यूचा निर्णय न घेतल्याचंही स्पष्ट केलं. दुपटीने वाढणारे कोरोना बाधितांचे प्रमाण आणि ओमिक्रॉनच्या सामाजिक प्रसाराची टांगती तलवार लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर कोरोना संबंधीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. (Goa CM Pramod Sawant declares restrictions in State)

सातत्याने मागणी होऊनही राज्य सरकारने (Goa Government) अद्यापही रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लावली नाही. गोवा पर्यटन राज्य असल्याने आपण निर्बंध लावू शकत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी याआधीच सांगितलं होतं. मात्र आता अनेक जण एकत्रित येण्यामुळे कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात होत असल्याने यापुढे प्रचारसभा, मेळावे, संमेलने यांना यापुढे केवळ 100 व्यक्तींनाच हजर राहता येणार आहे.

कोरोना संबंधीच्या आदर्श कार्यप्रणाली अर्थात एसओपीच्या पालनासाठी राज्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सक्रिय केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली आहे. नव्या नियमानुसार सर्व आस्थापने, कॅसिनो, हॉटेल्स - बार केवळ 50 टक्के आसन क्षमतेने चालू ठेवता येणार आहेत.

राज्याच्या सीमांवर कडक तपासणी

गोवा राज्याच्या सीमांवर यापुढे पोलिस आणि प्रशासनातर्फे कडक तपासणी करण्यात येणार आहे. रेल्वे आणि विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे पूर्ण लसीकरण अथवा आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी तसेच सात दिवसांचे अलगीकरण अनिवार्य, सातव्या दिवशी पुन्हा चाचणी (Corona Test) सक्तीची करण्यात आली आहे.

राज्यात नवे 1432 रुग्ण

सध्या राज्यात तब्बल 5931 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे (Corona) दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत 14 जणांना अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केले आहे. काल दिवसभर 6592 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी तब्बल 1432 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT