World Suicide Prevention Day 2023 Dainik Gomantak
गोवा

World Suicide Prevention Day 2023: गोव्यात 2011 पासून 3,286 जणांनी संपवले जीवन; पुरुषांचे प्रमाण अधिक

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात सर्वात कमी 4.6 टक्के आत्महत्येचा दर आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

World Suicide Prevention Day 2023: गोव्यात 2011 ते जून 2022 या काळात 3 हजार 286 जणांनी आत्महत्या केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात सर्वात कमी 4.6 टक्के आत्महत्येचा दर आहे. मात्र गोव्यासारख्या छोट्या राज्यातील ही आकडेवारी चिंताजनक आहे.

मानसिक आरोग्याच्या समस्या, नैराश्य, वैवाहिक कलह, प्रेम प्रकरणे, आर्थिक नुकसान, मद्यपानाचे व्यसन, ड्रग्सच्या आहारी जाणे व काही प्रमाणात बेरोजगारी अशा अनेक कारणांसाठी लोक आत्महत्या करतात.

यामध्ये बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तींचे प्रमाण सर्वात कमी आहे. 2021 मध्ये बरोजगारीमुळे राज्यात 6 जणांनी आत्महत्या केली आहे, असे आपचे आमदार व्हेंसी व्हीएग्स यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरातून समोर आले आहे.

प्रत्यक्ष आयुष्य संपवणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सोशल मीडिया व विविध अँप्लिकेशन्समुळे हल्लीच्या पिढीतील मुलांमध्ये संयम राहिलेला नाही. यामुळेच नैराश्यात वाढ होते.

परिणामी तरुण आत्महत्येकडे वळतात, समुपदेशक केतकी परब यांनी 'गोमन्तक'शी बोलताना सांगितले.

आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर वेळीच आपल्या आप्तजनांशी बोलले पाहिजे. गोव्यात इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेव्हिअर च्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम होत असतात.

'टेलीमानस' च्या माध्यमातून तुम्ही केव्हाही मदत घेऊ शकता, अशी माहिती मानसोपचारतज्ञ डॉ. प्रियांका सहस्त्रभोजने यांनी दिली.

दरम्यान संपूर्ण भारताचा आत्महत्येचा दर 16.3 इतका आहे. भारताच्या तुलनेत गोव्यात सर्वात कमी 4.6 टक्के आत्महत्येचा दर आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, आणि मणिपूर या राज्यांमध्ये अशा घटना सर्वाधिक घडतात. गोव्यासह केरळ आणि तेलंगणामध्ये हे प्रमाण कमी आहे.

गोव्यातील आत्महत्येच्या प्रकरणांची आकडेवारी

वर्ष आत्महत्या करणाऱ्यांची संख्या

  • 2011 - 281

  • 2012 - 282

  • 2013 - 314

  • 2014 - 286

  • 2015 - 308

  • 2016 - 277

  • 2017 - 266

  • 2018 - 249

  • 2019 - 259

  • 2020 - 303

  • 2021 - 311

  • 01 जानेवारी-30 जून 2022 -150

Edited By - Jayashri Desai

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT